Shreya Maskar
घरी हेअर स्पा करण्यासाठी सर्वप्रथम केसांना तेल लावा. मोहरी, नारळ, बदाम यांचे कोमट तेल संपूर्ण केसांना लावा. तेलाने तुमच्या टाळूमध्ये मसाज करा.
कोमट पाण्यात कॉटन टॉवल बुडवा आणि केसांभोवती गुंडाळा. २०-२५ मिनिटे तसेच राहू द्या. जेणेकरून तेल केसांमध्ये चांगले मुरेल.
कोमट टॉवेलमुळे केसांवरील तेल ओलावते. तुमचे केस आणि टाळू दोन्ही मजबूत करेल. यामुळे केसांची वाढ होते.
आता केसांना शॅम्पू करा. केस पूर्णपणे कोमट पाण्याने धुवा. त्यानंतर केस टॉवेलमध्ये गुंडाळा आणि ५-१० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर टॉवेलने केस कोरडे करा.
हेअर मास्क बनवण्यासाठी बाऊलमध्ये नारळ तेल, ऑलिव्ह ऑइल, अंड्याचा पांढरा भाग, मध, दही यांची एक पेस्ट बनवा. हा मास्क ब्रशने केसांना पूर्णपणे लावा. त्यानंतर केस घट्ट गुंडाळा आणि अर्धा तास तसेच राहू द्या.
शेवटी केस शॅम्पूने चांगले धुवावे. नंतर कंडीशनर लावा आणि टॉवेलमध्ये गुंडाळा. यामुळे केस अधिक मऊ आणि सुळसुळीत होतात.
नंतर टॉवेलने केस पुसून घ्या आणि हेअर सीरम लावा. हेअर सीरम केसांच्या मुळांना अधिक पोषण देते. त्यानंतर केस ब्लो ड्रायरने वाळवा.
कोणताही घरगुती पदार्थ चेहऱ्याला आणि त्वचेला लावण्याआधी त्याची पॅच टेस्ट आवर्जून करा.