Shreya Maskar
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते. त्यामुळे चेहऱ्याला सतत मॉइश्चराइजर लावा. जेणेकरून त्वचा हायड्रेट राहील.
तसेच रोजच्या धावपळीत स्किन केअर आपण करत नाही किंवा राहून जात, यामुळे चेहरा टॅन होतो, पिंपल्स येतात. असे होऊ नये म्हणून चेहऱ्याला दह्याचा फेस पॅक लावा.
दही चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे एका बाऊलमध्ये दही, हळद, जायफळ घालून पेस्ट बनवून घ्या. तुम्ही यात गुलाब पाणी देखील टाकू शकता.
चेहरा कोमट पाण्याने धुवा, त्यावर तयार फेस पॅक लावा आणि १५-२० मिनिटे ठेवून द्या. तोवर डोळ्यावर फ्रेश काकडी ठेवा. जेणेकरून डोळे थंड होतील.
त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून त्यावर लगेच मॉइश्चराइजर करा. यामुळे काळवंडलेला चेहरा ग्लो करतो.
दह्याच्या फेसपॅक हिवाळ्यात त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. महिन्यातून २-३ वेळा हा फेस पॅक लावल्याने कोरडी त्वचा हायड्रेट राहते आणि काळे डाग दूर होतात.
जायफळ ही जशी चवीला बेस्ट असते. तसेच तिचे त्वचेला देखील फायदेशीर ठरते. यामुळे चेहर्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या देखील हळूहळू कमी होतात.
कधीही घरगुती प्रोडक्ट त्वचेवर लावताना पॅच टेस्ट आवर्जून करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.