AAP leader Jaipal Singh Bawa injured after a daylight shooting incident in Amritsar, currently undergoing treatment at a local hospital. saam tv
देश विदेश

आम आदमी पक्षाच्या नेत्यावर दिवसाढवळ्या गोळीबार; राजकीय वर्तुळात खळबळ

अमृतसरमध्ये आम आदमी पक्षाचे नेते जयपाल सिंह बाऊ यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Omkar Sonawane

पंजाब: अमृतसर येथील आम आदमी पक्षाचे नेते जयपाल सिंह बाऊ यांना दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी दहशत पासली असून जखमी अवस्थेत जयपाल सिंह बाऊ यांना अमृतसर येथील एका रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयपाल सिंह यांचा गाडी पार्किंगवर झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि हा वाद विकोपाला जाऊन गोळीबार झाला. यामध्ये आम आदमी पक्षाचे नेते जयपाल सिंह आणि नरेंद्र सिंह हे या घटनेत जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिसर सील केला. जयपाल सिंह बाऊ हे आम आदमी पक्षाचे नेते असून अमृतसरमधील वॉर्ड क्रमांक 42चे प्रभारी आहेत. त्यांनी यापूर्वी आम आदमी पक्षाच्या वतीने त्यांनी पालिकेची निवडणूक लढवली होती. घटनेनंतर आम आदमी पक्षाचे आमदार इंदारवीर सिंह निज्जर हे देखील रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जयपाल सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांकडून त्याच्या तब्येतीची माहिती घेतली.

आमदार निज्जर म्हणाले, या घटनेमागील खरा हेतु काय होता हे अजून स्पष्ट झालेले नाही, तसेच यामध्ये काही राजकीय वैर असल्याचे देखील समोर आले नाहीये. तपासानंतरच सर्व समोर येईल. नगरससेवक वरपाल सिंग बब्बर यांनी सांगितले की, जयपाल सिंग हे माझे जवळचे सहकारी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, परिस्थिति चिघळली आणि त्याचे रूपांतर संघर्षात आणि गोळीबार झाले. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अनैतिक संबंधातून नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ३ मुलांची हत्या केली; नंतर...

Maharashtra News Live Update: बुलढाण्यात ५ कोटी खर्चूनही गाव तहानलेली

विरोधी पक्षाला मोठा धक्का; माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय समीकरण बदलणार

Face Care: क्लिन आणि सॉफ्ट स्किनसाठी पार्लर ट्रेटमेंटची काय गरज? घरीच हा फेसमास्क करेल सगळे पॉब्लेम दूर

नाशिक हादरलं! 'मजामस्ती'साठी पोलीस निरीक्षकाकडून गोळीबार?

SCROLL FOR NEXT