अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
नाशिक पोलीस दलातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयुक्तलयाच्या हद्दीतील गजबजलेल्या एका पोलीस ठाण्यात चक्क शासकीय पिस्तुलातून गोळीबार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. कुठलाही वाद, चकमक आणि गुन्हेगारी कारवाई किंवा आपत्कालीन परिस्थिति नसताना फक्त मजामस्तीच्या भरात संबंधित पोलीस निरीक्षकानेच फायरिंग केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.यावरच आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करत पोलीस दलावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नाशिकमध्ये पोलीस ठाण्यासारख्या संवेदनशील ठिकाणी एका पोलीस निरीक्षकाने केवळ 'मजामस्ती' म्हणून शासकीय पिस्तुलातून गोळीबार करावा, म्हणजे मनमौजी कारभाराचा नमुना आहे. सामान्य नागरिकांना सुरक्षेचे धडे देणारेच आता कायद्याची ऐशीतैशी करत आहेत.सर्वात संशयास्पद आणि संतापजनक बाब म्हणजे, आठवडा उलटूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साधलेले मौन! यावर नासिक पोलिस आणि गृह विभाग बोलणार का?
१. CCTV फुटेज गायब करण्याचा आणि 'डेली डायरी'मध्ये नोंद न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का?
२. नियम धुडकावून गोळीबार करणाऱ्या आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी ही सुंदोपसुंदी सुरू आहे का?
३. स्वतःच्याच माजलेल्या अधिकाऱ्यावर कारवाईचे धाडस दाखवणार की 'खाकी-खाकी भाई भाई' म्हणत विषय मिटवणार?
गृह विभाग आणि सरकारने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी. असे अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.