India Corona Update Saam Tv
देश विदेश

India Corona Update: चिंता वाढली! देशात एका दिवसात 7,830 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 223 दिवसांतील हा सर्वात मोठा आकडा!

Corona Virus: रोज कोरोना रुग्णांचा (Corona Patient) धडकी भरवणारा नवीन आकडा समोर येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi News: भारतातील कोरोना व्हायरच्या (Corona Virus) संसर्गाच्या वेगाने सरकारसोबतच नागरिकांची चिंता वाढवली आहे. देशात कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रोज कोरोना रुग्णांचा धडकी भरवणारा नवीन आकडा समोर येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात मोठ्यासंख्येने कोरोना रुग्ण आढळले आहेत. 223 दिवसांतील हा सर्वात मोठा आकडा असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशामध्ये 7,830 कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांचा हा आकडा 223 दिवसांतील सर्वाधिक आहे.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजारांच्या वर गेली आहे. आता देशात 40,215 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. यामधील काही कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर काही घरी राहून उपचार घेत आहेत.

तसंच, 'मंगळवारी 2 लाख 14 हजार 242 जणांची कोरोना चाचणी केली. यामधील 7,830 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर गेल्या 24 तासांत संसर्गामुळे 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, हरियाणा आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. केरळमध्ये पाच कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 31 हजार 16 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.' अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशामध्ये एकूण संक्रमणांपैकी ०.०९ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. देशामध्ये कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर ९८.७२ टक्के नोंदवला गेला आहे. तर देशामध्ये कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 4,42,04,771 वर पोहोचली आहे. तर मृत्यू दर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी करता येणार हवाई सफर

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

SCROLL FOR NEXT