Viral News
Viral NewsSaam TV

Old Woman Viral Video: आजीचा नादखुळा स्टंट! फटाक्यांची पेटती माळ घेऊन आजी उतरली रस्त्यावर; पुढे काय झालं? पाहा VIDEO

Grand Mother playing with Firecrackers Video: सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध आजीबाईंचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
Published on

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच अनेक स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही स्टंट करुन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काही स्टंटचे व्हिडिओपाहून लोकांना आर्श्चर्याचा धक्काच बसतो. यासह काही स्टंट असेही असतात जे पाहून नेटकरी पोट दुखेपर्यंत हसतात. सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध आजीबाईंचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये आजीबाईंनी मोठा कहर केलाय. त्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी हातामध्ये चक्क फटाक्यांची पेटलेली माळ घेतली आहे. फटाके फुटत असताना या आजीबाईंनी माळ सोडून दिलेली नाही. त्या ती माळ घेऊन घरासमोर असलेल्या रस्त्यावर पुढे मागे आणि गोल फिरत आहेत. एखादं लहान मुलं सुरसुरी घेऊन जशी मजा करतात अगदी त्याच पद्धितीने या आजीने स्टंट केला आहे.

Viral News
Viral News: चित्तथरारक! स्टंटबाजीच्या नादात कारच्या चाकाखाली आलं डोकं, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

अनवाणी पायांनी केला स्टंट

फटाके फोडत असताना नेहमीच पायात चप्पल घातलेली असावी. कारण खाली पडलेल्या ठिणगीवर पाय पडल्यास त्याने मोठ्या प्रमाणावर पाय भाजला जाण्याची शक्यता असते. मात्र या आजीबाई कशालाही घाबरत नाहीत. त्या अगदी बिंधास्त अनवाणी पायांनी रस्त्यावर फटाके घेऊन उतरल्या आहेत.

आजीचा हा स्वॅग पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अशा प्रकारे फटाके फोडत असताना या आजीबाईंना कोणतीही भीती वाटत नाही.फटाक्यांची माळ असल्याने त्याचा मोठा आवाज होतो आणि काही ठिणग्या देखील त्यांच्या अंगावर उडतता. मात्र एखाद्या भाईलाही लाजवेल असं काहीसं या आजींनी केलं आहे.

Viral News
Kalyan Crime News: कल्याणमध्ये नेमकं चाललंय काय?, पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसाच्या डोक्याला घेतला चावा, घटनेचा व्हिडिओ आला समोर!

सोशल मीडियावर आता या आजींची मोठी चर्चा रंगली आहे. या आजी नेमक्या कोण आहेत? त्या कुठे राहतात असा प्रश्न नेटकरी विचारतायत. तसेच काहींनी कमेंटमध्ये या कॉलेजच्या बॅक बॅन्चर आणि मस्तीखोर मुंलींपैकी एक असतील असं म्हटलं आहे. आजीचा अनोखा अंदाज पाहून नेटकऱ्यांनी यावर हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहे. @evershining_media या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत २ लाखांहून अधिक व्हुव्ज या व्हिडिओला मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com