PM Modi  Saam Tv
देश विदेश

77th Independence Day: PM मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिली 5 मोठी आश्वासने, म्हणाले...

Priya More

PM Narendra Modi 5 Big Promises: आज भारत ७७ वा स्वातंत्र दिन (Independence Day) साजरा करत आहे. संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावरुन (Red Fort) देशाला संबोधित केलं. त्यांनी या भाषणात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) देशातील जनतेला अनेक आश्वासनं दिली आहेत. त्यांनी आजच्या भाषणामध्ये नेमक्या काय घोषणा केल्या हे आपण पाहणार आहोत.

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, त्यांचे सरकार 13,000 ते 15,000 कोटी रुपयांच्या वाटपासह पुढील महिन्यात 'विश्वकर्मा योजना' सुरू करणार आहे. ही योजना पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना खास धोबी, सोनार इत्यादी कुशल कामगारांसाठी असेल.

2. पीएम मोदी यांनी सांगितले की, त्यांचे सरकार जन औषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. सर्वांना परवडणारी जेनेरिक औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी 'जन औषधी केंद्रे' उघडण्यात आली आहेत. मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तीला दरमहा 3,000 रुपये खर्च करावे लागतात. परंतु 100 रुपयांची औषधे जनऔषधी केंद्रांतून 10-15 रुपयांत दिली जातात.

3. शहरांमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार एक योजना सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी आज केली. त्यांनी सांगितले की, या योजनेमुळे शहरांमध्ये राहणाऱ्या आणि स्वत:चे घर नसलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना बँक कर्जात दिलासा मिळणार आहे.

4. या व्यतिरिक्त पीएम मोदींनी स्वातंत्र्यदिनी घोषणा केली की, पुढील पाच वर्षांत भारत जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. आपल्या सरकारने देशाची अर्थव्यवस्था कशी मजबूत केली आहे हे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, 2014 मध्ये जेव्हा ते पंतप्रधान झाले, तेव्हा भारत अर्थव्यवस्थांच्या बाबतीत 10 व्या क्रमांकावर होता. तर आता 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

5. देशात होत असलेल्या महागाईवर पीएम मोदींनी सांगितले की, सरकार त्यावर उपाययोजना करेल आणि जनतेवरील महागाईचे ओझं कमी करेल. महागाई नियंत्रणात ठेवण्यात आपल्या सरकारला काही प्रमाणात यश आले असून त्यासाठी प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT