Andhra Pradesh Accident News saam tv
देश विदेश

Andhra Pradesh Accident: आंध्रप्रदेशमध्ये रिक्षा- बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 7 महिलांचा जागीच मृत्यू

Latest News: या अपघातामध्ये सात महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर सात महिला गंभीर जखमी झाल्या.

Priya More

Andhra Pradesh News: आंध्रप्रदेशमध्ये (Andhra Pradesh) ऑटो रिक्षा आणि बस यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (auto rickshaw and bus accident) झाला. काकीनाडा जिल्ह्यात रविवारी दुपारी ही घटना घडली. या भीषण अपघातामध्ये सात महिलांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी सात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या 14 महिला एकाच रिक्षातून प्रवास करत होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास झाला. महामार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका खासगी बसने तल्लारेवू बायपासजवळ ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. ही बस यानमच्या दिशेने जात होती. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सात महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर सात महिला गंभीर जखमी झाल्या. अपघातामध्ये बसचा चक्काचूर झाला आहे.

महत्वाचे म्हणजे, फक्त सात जण बसण्याची क्षमता असलेल्या रिक्षामधून 14 महिला प्रवास करत होत्या. या अपघातात जखमी झालेल्या सात महिलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आंध्रप्रदेश पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले. तर अपघातानंतर रिक्षाचालक फरार झाला. पोलिसांनी पुढे असे सांगितले की, ऑटो रिक्षातून प्रवास करणाऱ्या 14 महिलांपैकी 6 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एका महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी पुढे सांगितले की, सर्व मृत आणि जखमी झालेल्या महिला या नजीकच्या नीलापल्ली गावामध्ये राहणाऱ्या आहेत. त्या कोळंबीच्या शेतात काम करणाऱ्या मजूर आहेत. या अपघातातील जखमी महिलांवर काकीनाडा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास आंध्रप्रदेश पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

SCROLL FOR NEXT