Siddhi Hande
मकरसंक्रांतीला महिला हळद-कुंकू करतात. यानिमित्त अनेक सुवासिनींना बोलवतात.
मकरसंक्रांतीला महिला छान काळ्या रंगाची साडी नेसतात. त्यावर मराठमोळी ज्वेलरी घालतात.
या मकरसंक्रातीला तुम्ही काळ्या साडीवर छान हेअरस्टाईल करा. या हेअरस्टाईलमध्ये सर्वात सुंदर तुम्हीच दिसाल.
कोणत्याही लूकवर बबल ब्रेड हेअरस्टाईल छान दिसते. पारंपारिक साडी नेसल्यावर केसांची थोडी मॉडर्न हेअरस्टाईल करा.
तुम्ही काठपदर साडीवर रोझ शेप बन बांधू शकतात. हा बन मागच्या बाजूने गुलाबाच्या आकाराचा दिसेल.
तुम्ही केसांची लूझ बोहो ब्रेड हेअरस्टाईल करु शकतात. ही हेअरस्टाईल थोडी वेणीसारखी दिसते. त्यात तुम्ही वेगवेगळी फुले माळू शकतात.
तुम्ही केसांची स्लीक बॅक हेअरस्टाईल करु शकतात. या केसांना खालच्या बाजूने थोडं कर्ल्स करा.
जर तुमचे केस मध्यम आकाराचे असतील तर फ्रेंच रोल बन बांधू शकतात. हा एका बाजूने पूर्ण प्लेन दिसतो. दुसऱ्या बाजूने तुम्ही त्याला स्टाईल करु शकतात.