Siddhi Hande
प्रत्येक मुलीचे सौंदर्य तिच्या केसांमुळे अजूनच खुलतं असं म्हणतात. काहींचे केस लहान तर काहींचे मोठे असतात.
केसांची स्टाईल करण्यासाठी त्याचा व्यवस्थित हेअर कट करणे गरजेचे आहे. यामुळे तुमचा लूक अजूनच छान दिसतो.
जर तुमचे केस लहान असतील तर तुम्ही बॉब कट करु शकतात. हा हेअरकट केल्यानंतर केस सावरणे खूप सोपे होते.
जर तुमचे केस छान लांबसडक असतील तर त्याला लेअर कट खूप शोभून दिसेल. यामुळे केस बांधल्यावर वेगवेगळे लेअर दिसतील.
लांब केसांसाठी स्टेप कटदेखील बेस्ट दिसेल. यामध्ये केस वेगवेगळ्या स्टेप्समध्ये कापले जातात. या स्टेप्स खूप सुंदर दिसतात.
बटरफ्लाय कट केल्यावर केसांना वेगळाच लूक येतो. यामुळे केस मागच्या बाजूने बटरफ्लायसारखेच दिसतील.
तुम्हाला केसांना जर सिंपल लूक द्यायचा असेल तर यू कट बेस्ट दिसेल. यामुळे तुमच्या केसांना खालच्या बाजूने यू शेप दिला जाईल.
व्ही कट केल्यावर केसांचा शेप व्ही आकाराचा दिसतो. मोठ्या केसांसाठी व्ही शेप चांगला दिसेल.