ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दऱ्या खोऱ्या, धबधबे आणि हिरवळ यामुळे लोणावळा हे ठिकाण डेस्टिनेशन वेडिंगसाठी परफेक्ट मानले जाते. तसेच लोणावळ्यात लक्झरी रिसॉर्टस्, व्हिला आणि फार्महाऊसेस मध्ये भव्य वेडिंग करता येतात.
मुंबई जवळ असलेले अलिबाग हे ठिकाण बीच वेडिंगसाठी खुप प्रसिध्द आहे. सनसेट, अथांग समुद्र आणि बीच समोरील व्हिला यामुळे लग्न अविस्मरणीय होतं.
कमी गर्दी आणि प्रसन्न वातावरणामुळे हे ठिकाण ओळखले जाते. पंचगणी हे स्ट्रॉबेरी फार्म्स आणि निसर्गसौंदर्यामुळे इंनटिमेट डेस्टिनेशन वेडिंगसाठी योग्य आहे.
या ठिकाणी तुम्ही मालवणी बीच वेडिंग करु शकता. स्वच्छ समुद्र, पांढरी वाळू आणि मालवणी संस्कृतीमुळे तारकर्ली युनिक डेस्टिनेशन वेडिंगसाठी ओळखसे जाते.
मंदिरे, राजवाडे आणि सांस्कृतिक वारसा असलेलं कोल्हापूर रॉयल मराठी वेडिंगसाठी प्रसिध्द मानले जाते.
नाशिकमधील वाईनयार्ड्स आणि रिसॉर्ट्स आधुनिक आणि एलिगंट वेडिंगसाठी प्रसिद्ध आहेत.
औरंगाबाद हे हेरिटेज वेडिंग ठिकाण आहे. ऐतिहासिक वास्तू, लेणी आणि हेरिटेज हॉटेल्समुळे डेस्टिनेशन वेडिंगसाठी वेगळं आकर्षण आहे.