ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नेहमीची पर्यटनस्थळं गर्दीची आणि महागडी असतात. अशातच नवीन, कमी प्रसिद्ध पण शांत वातावरण असलेली ठिकाणे निवडावी. प्रवास सुरक्षित आणि कमी खर्चात होतो. ट्रिपसुध्दा बजेटमध्ये प्लॅनिंग केली जाते.
दापोली हे कोकणातील शांत आणि स्वच्छ ठिकाण आहे. येथे तुम्ही शांत समुद्रकिनारी जावून बसू शकतात. इथे बीच, मंदिरे फिरु शकता आणि खाण्याचा आस्वाद घेऊ शकता. दापोली या ठिकाणी कुटुंबासोबत येवून सुंदर २ दिवस तुम्ही स्पेंड करु शकता.
हरिहरेश्वर हे धार्मिक आणि निसर्गप्रेमींसाठी परफेक्ट ठिकाण आहे. शिवमंदिर, स्वच्छ समुद्रकिनारा आणि शांत वातावरणामुळे प्रत्येक व्यक्तीला हि जागा आवडण्यासारखी आहे.
राजमाची फोर्टला न जाता राजमाची गावात जावून गावात राहण्याचा अनुभव घ्या. गावातील घरगुती जेवण, शुद्ध हवा आणि शांत वातावरण मिळते. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ही बेस्ट जागा आहे.
रतनवाडी हे भंडारदऱ्याजवळील शांत आणि सुंदर गाव आहे. प्राचीन मंदिर, निसर्ग आणि धबधबे येथे पाहायला मिळतील.
गोव्याजवळील तारकर्ली हे अतिशय सुंदर असे ठिकाण आहे. गोवा जाणे शक्य नसेल तर तु्म्ही कुटुंबासोबत तारकर्ली या ठिकाणाला भेट देवू शकता. येथे समुद्रात अनेक अॅक्टीव्हीटीज करु शकता. तसेच कोकणी खाद्य संस्कृतीचा तुम्ही आस्वाद घेवू शकता.
बजेटमध्ये ट्रिप प्लॅन करताना हॉटेलपेक्षा होमस्टे निवडावा. तसेच लोकल खाद्या संस्कृतीचा आनंद घ्यावा. प्रवास करताना खाजगी वाहन टाळावे त्याऐवजी बस किंवा ट्रेनचा वापर करावा. टिकाट आधीच बुकिंग केल्यास खर्च कमी होतो.