Nagpur-Mumbai flight: आनंदाची बातमी! 20 मे पासून Air India ची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा, तिकिट दरही कमी होणार!

Nagpur-Mumbai additional flight : ही नागपूर-मुंबई विमानसेवा २० मेपासून सुरू होणार असून २८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. एअर इंडियाचे एआय-१६१३ हे यासाठी सज्ज आहे.
Nagpur-Mumbai flight
Nagpur-Mumbai flightsaam tv
Published On

Nagpur-Mumbai additional flight service of Air India: नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला जाण्यासाठी आता नागपूरकरांना अतिरिक्त विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. एअर इंडियाने ही अतिरिक्त विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २० मेपासून एअर इंडियाची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा होणार सुरु होणार आहे.

ही नागपूर-मुंबई विमानसेवा २० मेपासून सुरू होणार असून २८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. एअर इंडियाचे एआय-१६१३ हे यासाठी सज्ज आहे. हे विमान २० मे रोजी सकाळी ११ वाजता मुंबईहून उड्डाण भरून नागपूरमध्ये दाखल होईल.

Nagpur-Mumbai flight
Mumbai Coastal Road: कोस्टल रोडला 'छत्रपती संभाजी महाराज' यांचं नाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा

त्यानंतर हेच विमान एआय-१६१४ बनून पुन्हा नागपूर ते मुंबईसाठी उड्डाण करेल. हे विमान नागपूरमधून दुपारी १२:०५ वाजता मुंबईसाठी उड्डाण भरेल. एअर इंडिया कंपनीने नियमित विमानसेवेऐवजी अतिरिक्त उड्डाण भरण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Breaking News)

Nagpur-Mumbai flight
Sambhaji Maharaj Jayanti celebrations: इंग्लंडमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

हे विमान २० मे ते २८ ऑक्टोबरपर्यंत उड्डाण भरेल, त्यानंतर ते नियमित केले जाण्याची शक्यता आहे. एअर इंडियाच्या या विमानामुळे अन्य विमान कंपन्यांच्या तिकीटदरात घसरण होण्याची शक्यता. त्यामुळे नागपूर - मुंबई असा विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना एअर इंडियाच्या या सेवेमुळे मोठा दिलासा मिळून शकतो. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com