Chhattisgarh Accident News: राष्ट्रीय महामार्गवर ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू

Chhattisgarh Accident News: बलौदा बाजार राष्ट्रीय महामार्गवर ट्रक आणि पिकअपची एकमेकांना जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे.
Chhattisgarh Accident News
Chhattisgarh Accident Newssaam tv

Chhattisgarh News: छत्तीसगढच्या बलौदा बाजारात भीषण अपघात झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. बलौदा बाजार राष्ट्रीय महामार्गवर ट्रक आणि पिकअपची एकमेकांना जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगढच्या पलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडा पुलिया येथे अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात पाच महिला आणि एका लहान मुलांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर या अपघातात २० जण जखमी झाले आहेत. या अपघातात पिकअपमधील प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. तसेच या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात कसा झाला?

छत्तीसगढमध्ये भीषण अपघात झाला आहे. पिकअपमधील लोक छठीचा कार्यक्रम उरकून परत येत होते. त्याचवेळी ट्रक आणि पिकअपची एकमेकांना धडक दिली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Chhattisgarh Accident News
Gadchiroli Accident News: पाण्याने केला घात; एकाच गावातील ४ तरुणांचा गुदमरून मत्यू

आंध्रप्रदेशातही भीषण अपघात, ७ महिलांचा मृत्यू

आंध्रप्रदेशमध्ये ऑटो रिक्षा आणि बस यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. काकीनाडा जिल्ह्यात रविवारी दुपारी ही घटना घडली. या भीषण अपघातामध्ये सात महिलांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी सात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या १४ महिला एकाच रिक्षातून प्रवास करत होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com