Accident Expressway Saam
देश विदेश

Delhi-Mumbai: एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात, पिकअप व्हॅननं ११ स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडलं; महामार्गावर मृतदेहांचे तुकडे विखुरले

Delhi Mumbai Expressway Accident: एका भरधाव पिकअप वाहनाने ११ स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले. या अपघातात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Bhagyashree Kamble

गुरुग्रामजवळील हरियाणाच्या नूह जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर शनिवारी सकाळी एक भीषण रस्ता अपघात घडला. एका भरधाव पिकअप वाहनाने ११ स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले. या अपघातात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, अपघातानंतर आरोपी चालकाने पळ काढला असून, त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नूह पोलीस ठाण्याच्या फिरोजपूर झिरका सीमेवरील इब्राहिमवास गावाजवळ शनीवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर एका पिकअप वाहनाने ११ स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले. नंतर चालक तेथून फरार झाला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर, एकाचा रूग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

तर, ४ जणांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, मृतांमध्ये ६ महिलांचा समावेश आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महामार्गावर मृतांचे तुकडे विखूरलेले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. अपघातस्थळी पोलीस, रूग्णवाहिका आणि रस्ता सुरक्षा एजन्सीचे पथक दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, ४ जखमी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर चालक फरार झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या व्हिडिओतून फरार चालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. अपघातामागील नेमकं कारण काय? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत पुण्यातील या ५ किल्ल्यांवर नक्की फिरून या

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; बडा नेत्यानं हाती घेतलं धनुष्यबाण, सतेज पाटलांना शिंदेंचा धोबीपछाड

Crime News: औरंगाबादमध्ये हत्याकांड! तरुणाला पकडून हातपाय बांधले, नंतर टोळक्यांनी क्रूरपणे संपवलं, भलतंच कारण समोर आलं

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Horoscope Saturday: व्यवसायात होणार भरभराट, ५ राशींसाठी सुखाचा दिवस; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT