सध्या कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय. यासोबतच प्रयागराजच्या या जत्रेमध्ये उत्तर प्रदेशातील प्रतापगढचा 'चाय वाला बाबा' म्हणून ओळखला जाणारा बाबाची जोरदार चर्चा होताना दिसतेय. मुळात यापूर्वी हा बाबा चहा विकायचा. दिनेश स्वरूप ब्रह्मचारी हा गेल्या 40 वर्षांपासून सिविल सेवा इच्छुकांना मार्गदर्शन करतो. मुख्य म्हणजे काहीही न खाता, न बोलता तो आपलं जीवन जगत असतो.
मिळालेल्या माहितीनुसार, तो रोज दहा कप चहा पितात आणि मौनव्रत पाळता. परिक्षेतील उमेदवारांना तो हातवारे आणि व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन करतो.
असाच एक विद्यार्थी राजेश सिंह म्हणाले की, 'महाराज आम्हाला वर्षानुवर्षे मार्गदर्शन करतायत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं मौन असूनही लिहिलेले नोट्स आणि हावभावांद्वारे आम्ही त्यांचं म्हणणं समजून घेतो.
राजेश यांनी सांगितलं की, चाय बाबांचं ज्ञान हे त्यांच्या शब्दांच्या पलीकडे आहे. बाबांबद्दल ऐकून केवळ भारतीयच नाही तर परदेशी लोकही हैराण झाले आहेत.
हा चाय वाला बाबा विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि अभ्यासाचं साहित्य पुरवतो. तो व्हॉट्सॲपवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो. लोक म्हणतात की, चाय बाबाचं मौन त्याची उर्जा वाचवण्यासाठी ठेवण्यात आलं आहे. ज्याचा उपयोग तो उर्वरित ज्ञान मिळवण्यासाठी आणि लोकांशी शेअर करण्यासाठी करतो. जास्तीत जास्त लोकांचं भलं करणं हा त्याचा उद्देश आहे.
प्रयागराजच्या कुंभ मेळ्यामध्ये सामील झालेल्या चाय बाबा बद्दल कोणाला कळलं तोच त्याचा प्रशंसक होतो. बाबानी मौन बाळगण्याची आणि अन्न न घेण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्याने 40 वर्षांपासून एक कणही अन्न खाल्लेलं नाही. याशिवाय तो एक शब्दही बोलले नाहीत. जगण्यासाठी बाबा रोज 10 कप चहा पितो. याशिवाय उमेदवारांबद्दलची त्याची आपुलकी दिसून येते. तो यूपीएससीच्या उमेदवारांनाही मार्गदर्शन करतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.