Gang Rape: 21 वर्षीय नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार Saam Tv
देश विदेश

Gang Rape: 21 वर्षीय नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार

मध्य प्रदेश मधील इंदौर शहरात सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : मध्य प्रदेश मधील इंदौर शहरात सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. शाळेमधील मित्राने त्याच्या आणखी २ साथीदारांच्या मदतीने आपल्यावर सामूहिक बलात्कार (abuse) केला आहे, असा आरोप तरुणीने केला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (police) तिघा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधील इंदौर (Indore) शहरातील छत्रीपुरा (Chhatripura) भागामध्ये २१ वर्षीय तरुणी तक्रारदार राहते. ती विवाहित (Married) आहे. रोहित तोमर नावाच्या तिच्या शालेय मित्रानेच इंदौर मधील मंगलिया भागामध्ये घर आहे. रोहितने आपल्याला तिथे बोलावले आणि त्याच्या दोघा मित्रांच्या (friends) साथीने तिच्यावर बलात्कार केला आहे, असा आरोप तिने केला आहे.

हे देखील पहा-

त्यानंतर छत्रीपुरा पोलिसांनी रोहित तोमरला अटक केली असून त्याच्या २ मित्रांनाही ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. २१ वर्षीय तक्रारदार तरुणी मूळ आष्टा (Ashta) येथील रहिवासी आहे. दीड वर्षांपूर्वी लग्न झाल्यावर ती इंदौरमध्ये राहायला आली होती. आष्टा येथील रोहित तोमर तिच्याबरोबर शाळेत एकत्र शिकत होता. त्यामुळे मोबाईलवरुन दोघे एकमेकांच्या संपर्कामध्ये होते. नियमितपणे दोघांच्याही गप्पा होत असत.

घटनेच्या दिवशी रोहितने तिला इंद्रानगरजवळ भेटायला बोलावले. त्यानंतर तो तिला रिक्षात बसवून मंगलिया भागातील आपल्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने आपल्यावर बळजबरी केली, असा दावा पीडितेने केला आहे. त्यानंतर त्याचे आणखी २ मित्राना तिथे बोलावले. त्यानंतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत तिघांनी तिला तिच्या घरी सोडले. त्यावेळी तिने आपल्या बरोबर घडलेल्या प्रकाराची माहेरी माहिती दिली. छत्रीपुरा पोलिसांनी रोहित तोमरला अटक केली असून त्याच्या २ मित्रांचीही चौकशी सुरु केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT