मुंबई : म्हाडा सरळसेवा भरती परीक्षेचा (MHADA Exam) पेपर फोडण्याचा कट उघड झाल्यामुळे म्हाडाने ऐनवेळेस परीक्षा रद्द आली होती. यानंतर विविध परीक्षा घेण्याचा अनुभव असलेल्या टीसीएस कंपनीची या परीक्षेकरिता निवड करण्यात आली असून या कंपनीमार्फत १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) आस्थापनेवर विविध १४ संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्याकरिता जीए सॉफ्टवेअर (GA software) या कंपनीची निवड करण्यात आली होती. या कंपनीच्या (company) वरिष्ठ अधिकाऱ्याने गुप्ततेचा भंग करत पेपर फोडण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. म्हाडाने १२ ते २० डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली परीक्षा (Exam) ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे.
हे देखील पहा-
या वादावर पडदा टाकण्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांनी भरती परीक्षा म्हाडा स्वतः घेईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, म्हाडा प्रशासनामार्फत पावणे ३ लाख उमेदवारांची परीक्षा घेणे अशक्य असल्यामुळे अखेर विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएस (TCS) कंपनीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अगोदर भरती परीक्षा ऑफलाइन (Offline) पद्धतीने घेण्यात येणार होती.
यामुळे म्हाडाच्या निर्णयावर उमेदवारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. उमेदवारांची मते लक्षात घेऊन म्हाडाने अखेर १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन (Online) पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय हाती घेतला आहे. या परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक आणि अन्य सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहेत, असे म्हाडाने अधिकाऱ्याने सांगितले आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.