2006 Varanasi serial blasts convicted terrorist Waliullah Khan sentenced Breaking News
2006 Varanasi serial blasts convicted terrorist Waliullah Khan sentenced Breaking News SAAM TV
देश विदेश

वाराणसी साखळी स्फोटप्रकरणी १६ वर्षांनी निकाल; दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा

साम ब्युरो

वाराणसी: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसीमध्ये १६ वर्षांपूर्वी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयानं निकाल दिला आहे. दोषी दहशतवादी वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच वलीउल्लाह याला आणखी एखा प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सन २००६ मध्ये वाराणसीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये १८ जणांचा मृत्यू झाला होता.

वाराणसी साखळी बॉम्बस्फोट (Blast) प्रकरणी दोषी दहशतवादी वलीउल्लाह खान याला गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयानं ४ जून रोजी दोषी ठरवलं होतं. गाझियाबादचे जिल्हा सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांनी वलीउल्लाह याला निकाल दिला.

दरम्यान, वाराणसी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादी वलीउल्लाह खान याला न्यायालयानं ४ जून रोजी दोषी ठरवलं होतं. तर सोमवारी, ६ जून रोजी शिक्षा सुनावली जाणार होती. २००६ मध्ये वाराणसीत संकट मोचन मंदिर, दशासमेघ घाट आणि रेल्वे स्थानकात बॉम्बस्फोट झाले होते. यात २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते.

१६ वर्षे सुनावणीत १२१ साक्षीदार

वाराणसी (Varanasi) साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने न्यायालयात सांगितले होते की, स्फोट भीषण होते. या प्रकरणात १६ वर्षे सुनावणी दरम्यान १२१ साक्षीदारांनी साक्षी नोंदवल्या. बचाव पक्षाच्या वतीने वलीउल्लाहच्या कुटुंबीयांनीही साक्ष नोंदवली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan House firing Case : आरोपीच्या मृत्यूबाबत आईला वेगळाच संशय; हायकोर्टात याचिका

Maharashtra Politics 2024 : दानवेंची भेट नाकारल्याने मराठा आंदोलक भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट; पळशीतील तणावाचा Video समोर

Amazon Sale: स्वस्तच नाही, तर मस्तच! iPhone 14 च्या किंमतीत आणखी झाली घट, खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Ajit Pawar On Rahul Gandhi | गांधी घराण्यावर बोलताना अजितदादा चुकले! पुढे काय घडलं?

Uttam Jankar News | Sharad Pawar यांच्यासमोरच अजित पवारांना कावळ्याची उपमा, जानकरांनी सभा गाजवली..

SCROLL FOR NEXT