Salman Khan House firing Case : आरोपीच्या मृत्यूबाबत आईला वेगळाच संशय; हायकोर्टात याचिका

Anuj Thapan : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
Anuj Thapan
Anuj ThapanSaam Tv

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना शस्त्रे पुरवणारा अनुज थापनने मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील लॉकअपमध्ये बुधवारी (१ मे) आत्महत्या केली होती. त्याच्या कुटुंबीयांकडून त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या केली असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. आता या प्रकरणी महत्वाची अपडेट हाती आलेली आहे. अनुज थापनच्या आईकडून आरोपी अनुज थापनच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

Anuj Thapan
Elvish Yadav : एल्विश यादवच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

'पोलीस कोठडीत छळ करून अनुजची हत्या करण्यात आली' असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. यानंतर अनुजच्या कुटुंबीयांनी ह्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अनुज थापनचा मृत्यू संशयास्पद झाल्याचा दावा त्याच्या आईने याचिकेमध्ये केलेला आहे. अनुज थापनच्या आत्महत्येचं वृत्त हाती आल्यापासूनच त्याच्या कुटुंबीयांकडून आत्महत्याची सीबीआय तपासाची मागणी केली जात होती. या याचिकेची सुनावणी लवकरच होणार आहे. अद्याप सुनावणीची समोर आलेली नाही.

Anuj Thapan
कपिल शर्माच्या The Great Indian Kapil Show ने दीड महिन्यातच बोजा बिस्तारा गुंडाळला, समोर आलं मोठं कारण

अनुज थापन आणि त्याचा सहकारी सोनू बिश्नोईला २६ एप्रिल रोजी पंजाबमधून अटक करण्यात आली होती. त्या दोघांवरही सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप होता. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी, अनुज थापन, सोनू बिश्नोई, शूटर सागर पाल आणि विकी गुप्ता यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली. तर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईला वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Anuj Thapan
Naach Ga Ghuma Film : "सगळं एकदम चोख, कौतुकासाठी शब्दच अपूरे..."; ‘नाच गं घुमा’ पाहताच प्राजक्ता माळी काय म्हणाली?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com