Maharashtra Politics 2024 : दानवेंची भेट नाकारल्याने मराठा आंदोलक भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट; पळशीतील तणावाचा Video समोर

Lok Sabha Election 2024 : जालना लोकसभा मतदारसंघातील पळशी येथे आज भाजप कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमनेसामने आल्याने चांगलाच वाद झाला. घोषणाबाजी सोबत काही वेळ झटापटही झाली.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 Saam Digital
Published On

जालना लोकसभा मतदारसंघातील पळशी येथे आज भाजप कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमनेसामने आल्याने चांगलाच वाद झाला. घोषणाबाजी सोबत काही वेळ झटापटही झाली. मराठा आंदोलकांची रावसाहेब दानवे यांच्याशी भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट होऊ दिली नाही यावरून चांगलाच राडा झाला. त्यामुळे जालन्यातील पळशीत काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

रावसाहेब दानवे यांचा दौरा पळशी येथे असताना मराठा आंदोलक त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासाठी वीस वर्षात काय केलं? असा प्रश्न उपस्थित करणार होते. मात्र भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना रावसाहेब दानवे यांची भेट घेऊ दिली नाही. रावसाहेब दानवे यांची सभा झाल्यानंतर ते निघून गेले.

Maharashtra Politics 2024
Ajit Pawar: दहा वर्षात पंतप्रधान मोदींवर एकही आरोप झाला नाही: अजित पवार

मात्र स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना अडवले. भेट होऊ दिली नाही. त्यामुळे मराठा कार्यकर्ते आणि रावसाहेब दानवे हे समोरासमोर आलेच नाहीत. त्यामुळे संतापलेल्या मराठा आंदोलक आणि भाजप कार्यकर्ते नेते यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली. पळशीमध्ये काही काळ तणावाचं वातावरण होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं.

Maharashtra Politics 2024
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com