Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

केसरकर म्हणाले वडील कोण चोरतं का? प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेबांना महाराष्ट्रासाठी अर्पण केलं. तुमच्या आजोबांनी बाळासाहेबांना महाराष्ट्राच्या ओटीत टाकलेला आहे, त्यामुळे बाळासाहेब सर्वांचे आहेत.
deepak kesarkar criticises uddhav thackeray
deepak kesarkar criticises uddhav thackeray Saam Digital

- विनायक वंजारे

संजय राऊत (sanjay raut), विनायक राऊत (vinayak raut) यांच्यासारख वाईट बोलणं उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सुरू केले असल्याने महाराष्ट्रात आता काय शिल्लक राहिले नाही अशी टीका दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवर केली आहे. बाळासाहेबांच्या तोंडी काही वाक्य शोभून दिसत होती आणि बाळासाहेब हे बाळासाहेब होते. ती वाक्य प्रत्येकाच्या तोंडून शोभून दिसतील असं बिलकुल नाही असं म्हणत केसरकरांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत नारायण राणे, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिलं.

केसरकर पुढं बाेलताना म्हणाले हिंदूहृदय सम्राट हे उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क वरून का म्हटलं नाही. काँग्रेस सोबत तुम्ही नाक घासत गेलात. यालाच बाळासाहेबांचा विचार, स्वाभिमान म्हणतात का? याचे उत्तर महाराष्ट्राला तुम्हाला द्यायलाच लागेल.

deepak kesarkar criticises uddhav thackeray
Nira Dam Water : लोकसभा निवडणुकीत नीरेचा पाणीप्रश्न पेटला!; पंढरपूरच्या 9 गावांतील शेतकऱ्यांचा भाजपला थेट इशारा

केसरकर म्हणाले वडील कोण चोरतं का? प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेबांना महाराष्ट्रासाठी अर्पण केलं. तुमच्या आजोबांनी बाळासाहेबांना महाराष्ट्राच्या ओटीत टाकलेला आहे, त्यामुळे बाळासाहेब सर्वांचे आहेत.

उद्धव ठाकरे यांनी काजूला हमीभाव नाही. मात्र गद्दारांना हमीभाव अशी टीका केली. त्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले गद्दार असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंवर केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कॉमन मिनिमम प्रोग्रॅम शरद पवार लिहिणार आणि त्यावर तुम्ही सही करणार? बाळासाहेब असते तर कॉमन मिनिमम प्रोग्रॅम फाडून टाकला असता. शरद पवारांनी तुमचा पक्ष चार वेळा फोडला त्याच माणसाला आज निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रचार करणार? शिवसैनिकांनी भावनेच्या आहारी न जाता याचा विचार केला पाहिजे असे केसरकरांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

deepak kesarkar criticises uddhav thackeray
Voter Awareness Programme: लोकशाहीचा महोत्सव! पालघरसह साता-यात बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदार जागृती, 100 टक्के मतदानाचा निर्धार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com