Amazon Sale: स्वस्तच नाही, तर मस्तच! iPhone 14 च्या किंमतीत आणखी झाली घट, खरेदी करण्याची सुवर्णसंधी

iPhone 14 Sale: आयफोन सध्या देशातील सर्वाधिक मागणी असलेला स्मार्टफोन बनला आहे. अनेकांची हा फोन खरेदी करण्याची इच्छा आहे, मात्र याची किंमत पाहता बऱ्याच लोकांना ते शक्य होत नाही. अशातच जर तूम्हीही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.
iPhone 14 Price Drop
iPhone 14 Price DropSaam Tv

iPhone 14 Price Drop:

आयफोन सध्या देशातील सर्वाधिक मागणी असलेला स्मार्टफोन बनला आहे. अनेकांची हा फोन खरेदी करण्याची इच्छा आहे, मात्र याची किंमत पाहता बऱ्याच लोकांना ते शक्य होत नाही. अशातच जर तूम्हीही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. नविन iPhone 15 आणि iPhone 14 वर मोठी सूट मिळत आहे. Amazon वर सेलमध्ये तुम्ही हे फोन स्वस्तात खरेदी करू शकता.

नवीन iPhone 15 ची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. मात्र हा फोन सध्या Amazon वर फक्त 70,500 रुपयांना उपलब्ध आहे. जर तुम्ही पहिल्यांदा आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे लेटेस्ट आयफोन 15 खरेदी करण्याचे बजेट नसेल, तर तुम्ही आता आयफोन 14 देखील खरेदी करू शकता. कारण या फोनवर सर्वाधिक सूट दिली जात आहे.

iPhone 14 Price Drop
Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

iPhone 14

Amazon Great Summer Sale मध्ये iPhone 14 सध्या अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे. या फोनची किंमत 79,900 रुपये आहे. मात्र त्यावर 26 टक्के सूट दिली जात आहे. त्यानंतर याची किंमत 58,999 रुपये झाली आहे.

याशिवाय यावर काही कॅशबॅक आणि बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत. ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तुम्ही iPhone 12 किंवा iPhone 13 अपग्रेड करत असल्यास, तुम्ही तुमच्या जुन्या डिव्हाइसची किंमत आणखी कमी करण्यासाठी एक्सचेंज देखील करू शकता.

iPhone 14 Price Drop
Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

दरम्यान, आयफोन 14 भारतात 2022 मध्ये लॉन्च झाला होता. या लाइनअपमध्ये कंपनीने iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लॉन्च केले होते. जरी आयफोन 14 मध्ये 2021 च्या आयफोन 13 सारखीच फीचर्स मिळत असली तरी, आयफोन 14 प्रो मॉडेलमध्ये अपडेटड प्रोसेसर आणि डायनॅमिक आयलँड नॉच डिझाइनसारखे मोठे बदल दिसतात. तेच डायनॅमिक आयलंड डिझाइन आता नवीन iPhone 15 वरही दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com