Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Poco X6 5G Skyline Blue Colour: स्मार्टफोन निर्माता कंपनी Poco ने अलीकडेच आपल्या X6 5G चे नवीन व्हर्जन भारतात लॉन्च केला आहे. आता कंपनीने आपला फोन Poco X6 5G नवीन कलर व्हेरिएंट स्कायलाइन ब्लू मध्ये सादर केला आहे.
Poco X6 5G Skyline Blue Colour
Poco X6 5G Skyline Blue ColourSaam Tv

Poco X6 5G Skyline Blue Colour Variant:

स्मार्टफोन निर्माता कंपनी Poco ने अलीकडेच आपल्या X6 5G चे नवीन व्हर्जन भारतात लॉन्च केला आहे. आता कंपनीने आपला फोन Poco X6 5G नवीन कलर व्हेरिएंट स्कायलाइन ब्लू (Poco X6 5G Skyline Blue Color Variant) मध्ये सादर केला आहे.

म्हणजेच आता ग्राहक या नवीन रंग पर्यायांमध्ये देखील या फोन खरेदी करू शकतात. याआधी Poco X6 5G ब्लॅक आणि व्हाईट कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला होता. या नवीन कलर व्हेरियंटची किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Poco X6 5G Skyline Blue Colour
New Force Gurkha: ऑफ-रोडींगसाठी आहे बेस्ट! पॉवरफुल Force Gurkha भारतात लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Poco X6 5G स्कायलाइन ब्लू किंमत आणि ऑफर

Poco X6 5G स्कायलाइन ब्लू कलर व्हेरिएंटच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर याचा बेस व्हेरिएंट 8GB/256GB मॉडेल ग्राहक 21,999 रुपयांना, 12GB/256GB 23,999 रुपयांना आणि 12GB/512GB व्हेरिएंट 24,999 रुपयांना खरेदी करू शकतात.

हा फोन स्कायलाइन ब्लू, मिरर ब्लॅक आनि स्नोस्टॉर्म व्हाइट या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच फ्लिपकार्टवर याची विक्री केली जात आहे. यासोबतच फ्लिपकार्टवर काही निवडक बँकांच्या कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना 1,000 रुपयांची सूट दिली जात आहे. Flipkart Axis Bank कार्डधारकांसाठी 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Poco X6 5G Skyline Blue Colour
Google Audio Emoji: फोनवर बोलणं होईल आणखी मजेशीर, गुगलने आणलंय नवीन ऑडिओ इमोजी फीचर; कसा करायचा वापर?

Poco X6 मध्ये 6.67 इंच 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, 1,800 nits ब्राइटनेस आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. यासोबतच सेफ्टीसाठी यामध्ये गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देण्यात आला आहे.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, Poco च्या या मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये OIS सपोर्टसह 64MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो युनिट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com