Gym Workout Freepik
देश विदेश

Gym Workout: धक्कादायक! व्यायाम करता करता अचानक पडला खाली, २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Kerala: सोमवारी रात्री अंबलावायल परिसरात २० वर्षीय तरुणाचा जिममध्ये व्यायाम करत असताना मृत्यू झाला. एक तरुण व्यायाम करताना अचानक खाली पडतो.

Dhanshri Shintre

केरळमधील वायनाड जिल्ह्यात सोमवारी रात्री जिममध्ये व्यायाम करत असताना २० वर्षीय सलमान याचा मृत्यू झाला. अंबलावायल परिसरातील कुप्पक्कोली येथील रहिवासी असलेला सलमान व्यायाम करताना अचानक खाली पडतो असा एक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेने परिसरात धक्का बसला असून, त्याच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

घटनेनंतर सलमानला तात्काळ अंबलावायल रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडल्यावर त्याला कोझिकोडच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तो व्हेंटिलेटरवर होता. बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. माहितीनुसार रिपोर्टमधून असे समजले की, त्याच्या मृत्यूचे मुख्य कारण ब्रेन हॅमरेज आहे.

दरम्यान अशीच एक राजस्थानमध्ये देखील घडली आहे. राजस्थानमधील बिकानेरमध्ये जिममध्ये पॉवरलिफ्टिंग करत असताना राष्ट्रीय खेळाडू यष्टिका आचार्यचा दुर्दैवी मृत्यू झाला. यष्टिकाने २७० किलो वजन उचलले, पण अचानक तिचा हात घसरला आणि तोल गेला. वजन तिच्या मानेवर पडल्यामुळे तिच्या मानेकडचं हाड तुटलं. अपघातानंतर, तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. यष्टिकाचा मृत्यू हे एक मोठं शोकसंचालन ठरले आहे.

नेमकं काय झालं?

राजस्थानमधील बिकानेरच्या १७ वर्षीय राष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टर यष्टिका आचार्यचा जिममध्ये सराव करत असताना मृत्यू झाला. ती बिकानेरच्या नथ्थुसर गेट येथील बडा गणेश मंदिराजवळील द पॉवर हेक्टर जिममध्ये २७० किलो वजन उचलत होती, त्यावेळी वजन तिच्या मानेवर पडले आणि तिचा मृत्यू झाला. जिममध्ये तिच्यासोबत सराव करणाऱ्या इतर खेळाडूंनी सांगितले की, यश्तिका रोजप्रमाणे प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होती.

सराव करत असताना यष्टिकाचा हात घसरला आणि अचनाक तिचा तोल गेला. त्याचा परिणाम म्हणून २७० किलो वजनाचा रॉड तिच्या मानेवर पडला. जोरदार धक्क्यामुळे तिचा प्रशिक्षक देखील मागे पडला. यष्टिका बेशुद्ध पडल्यावर, जिममध्ये उपस्थित खेळाडूंनी तिला तात्काळ प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला आणि नंतर उपचारासाठी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर यष्टिकाला मृत घोषित केले. हा दुर्दैवी अपघात संपूर्ण खेळाडू समाजासाठी धक्का ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chintamani Aagman 2025 : भक्तांची चिंता दूर करणाऱ्या चिंतामणीचा फर्स्ट लूक; पाहा फोटो

Woman Health Care :प्रत्येक महिलेने हे ५ सूपरफूड खायलाच हवेत, वाचा काय काय फायदे होतील

कहां गायब हो गये ये लोग? जगदीप धनखड यांच्यानंतर आणखी एकजण बेपत्ता, ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक आरोप

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

Border 2: सनी देओलला मोठा झटका! 'बॉर्डर 2'ची रिलीजची तारीख अचानक बदलली, अभिनेता म्हणाला...

SCROLL FOR NEXT