Ukraine: 250 भारतीयांना घेऊन युक्रेनमधून एअर इंडियाचं दुसरं विमान दिल्लीत
Ukraine: 250 भारतीयांना घेऊन युक्रेनमधून एअर इंडियाचं दुसरं विमान दिल्लीत @YEARS
देश विदेश

Ukraine: 250 भारतीयांना घेऊन युक्रेनमधून एअर इंडियाचं दुसरं विमान दिल्लीत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप भारत देशात आणण्याकरिता केंद्र सरकारने (Central Government) मोहिम राबवली आहे. या भागमध्ये, रोमानियाची (Romanian) राजधानी बुखारेस्ट येथून युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना घेऊन येणारे दुसरे विमान आज पहाटे दिल्ली (Delhi) विमानतळावर (Delhi Airport) उतरले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी येथील विमानतळावर युक्रेन मधील नागरिकांचे गुलाबाचे फुल देऊन यावेळी स्वागत केले आहे. (2 Air India flight from Ukraine Delhi carrying 250 Indians)

हे देखील पहा-

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष (President) वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चेमध्ये भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीचा मुद्दा उपस्थित केला होता. या अगोदर बुखारेस्ट येथून २१९ लोकांना घेऊन पहिले विमान मुंबईमध्ये आले होते. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार की, ऑपरेशन गंगा अंतर्गत बुखारेस्टमधून २५० भारतीयांना (Indians) घेऊन येणारे दुसरे विमान रविवारी दिल्लीला पोहोचले आहे.

या २ उड्डाणावर आता बुडापेस्टहून तिसरे विमान देखील आज येण्याची शक्यता आहे. युक्रेन मधील भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या लोकांना शेजारी देशांमध्ये हलवताना अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळाली आहे. युक्रेनमध्ये सध्या सुमारे १६ हजार भारतीय अडकले आहेत. दिल्ली विमानतळावर भारतीय नागरिकांशी संवाद साधताना सिंधिया यांनी सांगितले आहे की, भारतात प्रत्येक नागरिक घरी परतला आहे. कृपया तुमच्या सर्व मित्रांना आणि सहयोगींना मेसेज पाठवा की आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांच्या सुरक्षित परतीची हमी देणार आहे.

पंतप्रधान मोदी युक्रेन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या संपर्कात आहेत, सर्वांना सुरक्षितपणे घरी आणण्याकरिता चर्चा सुरू आहे. तुमच्या सुरक्षित भारतात परतल्यावर मी एअर इंडियाचा मनापासून आभारी आहे. भारतीय दूतावासाने नागरिकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. युक्रेन मधील भारतीय दूतावासाने सांगितले आहे की, ते देशाच्या पूर्व भागात बदलत्या घडामोडी आणि परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भारतीय नागरिकांना युद्धाच्या संकटात संयम बाळगण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय नागरिकांच्या सुरक्षेकरिता सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे दूतावासाने सांगितले आहे. युक्रेनच्या पूर्व भागात बदलत्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. आमच्या नागरिकांच्या सुरक्षेकरिता आम्ही अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कामध्ये आहोत. युक्रेनमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना आमचा मेसेज आहे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे या ट्विटमध्ये सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

SCROLL FOR NEXT