रश्मी पुराणिक
पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. दिशा सलियन यांच्याप्रकारणाविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांच्यावर सातत्याने दिशा सलियन यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. दिशाविषयी समाज माध्यमावर चुकीची आणि बदनामीकारक माहिती देत संभ्रम निर्माण करणे या कृत्याविषयी नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरुद्ध तसेच त्यांनी केलेल्या आरोपांना माध्यमांवरून दुजोरा देणारे नितेश राणे आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करा, असे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिले आहे. (Take immediate criminal action against Narayan Rane Nitesh Rane Chandrakant Patil)
हे देखील पहा-
रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे की, दिवंगत दिशा सॅलियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. तिच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशा सॅलियनच्या आई- वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूविषयी खोटी आणि बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ.नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी, असे रुपाली चाकणकर यांनी यावेळी म्हंटले आहे.
रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितले आहे की, दिशाविषयी समाज माध्यमावर नमूद असलेली चुकीची आणि बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी अशी तक्रार आई वसंती सॅलियन आणि वडील सतीश सॅलियन यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे. यामुळे दिशाच्या मृत्यूविषयी कोणतेही पुरावे नसताना नारायण राणे यांच्यावर मृत्यूपश्चात तिचे चारित्र्यहनन करणे, तिची प्रतिष्ठा मलिन करणे , तिची आणि कुटुंबाची बदनामी करणे याचबरोबर दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय यंत्रणेमार्फत सुरु असल्याची खोटी विधाने करून मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवून दबाव निर्माण करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे या कृत्याविषयी नारायण राणे यांच्याविरुद्ध तसेच त्यांनी केलेल्या आरोपांना माध्यमांवरून दुजोरा देणारे नितेश राणे आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील तात्काळ फौजदारी कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास 24 तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहेत, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.
तसेच दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी समाज माध्यमावर तयार करण्यात आले असलेले लाखो खोटे अकाउंट्स बंद करून तिच्याविषयी नमूद असलेली खोटी माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी आणि अर्जदार श्रीमती व श्री. सॅलियन या जेष्ठ नागरिक असलेल्या दाम्पत्याला शांततेने आणि सुरक्षित जगता यावे याकरिता योग्य ती सुरक्षात्मक उपाययोजना करावी व अर्जदारांच्या मागणीनुसार या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.