Diwali Rocket Man Viral Video Twitter/@susantananda3
देश विदेश

Diwali Viral Video: 20 सेकंदात सोडले 11 रॉकेट! काकांचा स्वॅग पाहून NASAही कोमात, असलं धाडस न केलेलंच बरं

Diwali Rocket Man Viral Video: रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या माणसाने 20 सेकंदात सुमारे 11 रॉकेट सोडले. जखमी होण्याची किंवा भाजण्याची भीती न बाळगता त्यांनी हे धाडसी कृत्य केले.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल (Viral News) होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. काहीवेळा गोष्टी इतक्या मजेदार असतात की लोकांना पाहून प्रचंड आश्चर्य वाटतं तर कधी धक्का देखील बसतो. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये एक माणूस दिवाळीचे (Diwali) रॉकेट चक्क आपल्या हातातून सोडलं आहे. एक दोन नव्हे, तर तब्बल ११ रॉकेट पेटवून त्यांनी आपल्या हातातून सोडले आहेत. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. (Diwali Rocket Viral Video)

कोरोनानंतर दोन वर्षांनी देशात दिवाळी ही निर्बंधमुक्त होतेय त्यामुळे दिवाळीचा उत्साह शिगेला आहे. अशात काही अतिउत्साही लोक हे दिवाळीचे फटाके फोडण्यासाठी पुढे-मागे बघत नाही. फटाके फोडणं चुकीचं नाही, पण ते सुरक्षितरीत्या फोडणं गरजेचं आहे. या व्हिडिओतील काकांना मात्र फटाक्यांची बिल्कुल भीती वाटत नसल्याचं दिसतंय. कारण त्यांनी दिवाळीचे रॉकेट हे बाटलीत पेटवण्याऐवजी चक्क हातात घेऊन पेटवले आणि तो हातातूनच वर सोडले. बरं एवढंच नाही तर, या काकांनी रॉकेट पेटवण्यासाठी सिगारेट तोंडात धरलं आणि मग रॉकेटची वात शिलगवली. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. (Rocket Man Viral Video)

पाहा व्हिडिओ -

दिवाळीच्या निमित्ताने भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुसंता नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ही छोटी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॉकेट पेटवण्याच्या या भन्नाट पद्धतीमुळे नेटिझन्स थक्क झाले आहेत. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, त्या व्यक्तीने काही सेकंदात त्याच्या ओठांमध्ये असलेल्या सिगारेटचा वापर करून अनेक रॉकेट सोडले. त्यात असे दिसून आले की, रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या माणसाने 20 सेकंदात सुमारे 11 रॉकेट सोडले. जखमी होण्याची किंवा भाजण्याची भीती न बाळगता त्यांनी हे धाडसी कृत्य केले.

वन सेवा (IFS) अधिकारी सुसंता नंदा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हिडिओला कॅप्शन दिले, “नासाचे संस्थापक नक्कीच भारताचे होते." 21 ऑक्टोबरला व्हिडिओ पोस्ट केल्यापासून, त्याला 980.9k व्ह्यूज, 22.4k लाईक्स आणि भरपूर कमेंट्स मिळाल्या आहेत. एका यूजरने तर या काकांना थेट 'रॉकेटमॅन' ही उपाधी देऊन टाकली.

दरम्यान असे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात ही अवली लोकं आपापल्या पद्धतीने फटाके फोडताना दिसतायत. उल्हासनगरच्या एका माथेफिरूने एका रहिवासी इमारतीवर मध्यरात्रीच्या सुमारास फटाक्यांचे रॉकेट डागल्याची घटना घडली. हे रॉकेट्स थेट नागरिकांच्या घरात जाऊन फुटल्याने नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ -

उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरात हिरापन्ना अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीवर सोमवारी पहाटे सव्वादोन ते अडीचच्या सुमारास एका अज्ञात माथेफिरूने फटाक्यांचे रॉकेट सोडले. इमारतीच्या बाहेर हातात रॉकेटचा बॉक्स घेऊन हा माथेफिरू उभा होता आणि त्यातून सुटणारे रॉकेट्स थेट नागरिकांच्या बाल्कनीवर हा माथेफिरू सोडत होता. हे रॉकेट्स नागरिकांच्या घरात जाऊन फुटत होते. (Tajya News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : मी १०० रुपये देतो, ठाकरेंच्या मागील १० भाषणात विकासावर एक वाक्य दाखवा; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Government Hostel Allowances: मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ, सरकारचा मोठा निर्णय

Beed Flood: अतिवृष्टीनं शेतीचा चिखल, सरकार ओला दुष्काळ’ जाहीर करणार का?

Wednesday Horoscope : भाग्यकारक घटना घडणार; ५ राशींच्या लोकांवर आनंदाची उधळण होणार

Maharashtra Live News Update: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT