Delhi-Mumbai AQI: फटाक्यांमुळे दिल्ली-मुंबईत मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण; हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिक त्रस्त

Delhi-Mumbai Air Quality Index News: देशाची राजधानी दिल्ली येते हवेची गुणवत्ता सर्वात जास्त खालवली होती, त्यापाठोपाठ आर्थिक राजधानी मुंबईतही हवेच्या गुणवत्ता चांगली नव्हती.
Delhi-Mumbai AQI
Delhi-Mumbai AQISaam TV
Published On

शिवाजी काळे, नवी दिल्ली

Air Pollution In Delhi & Mumbai: देशासह राज्यात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर प्रथमच निर्बंधमुक्त दिवाळी (Diwali 2022) असल्याने यावेळी सगळीकडेच दिवाळी जोरदार साजरी होतेय. काल, सोमवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची (Firecrackers) आतिषबाजी करण्यात आली, यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण (Air Pollution) होऊन हवेची गुणवता (Air Quality Index) खालवली आहे. देशाची राजधानी दिल्ली येते हवेची गुणवत्ता सर्वात जास्त खालवली होती, त्यापाठोपाठ आर्थिक राजधानी मुंबईतही हवेच्या गुणवत्ता चांगली नव्हती. या सगळ्याचा परिणाम म्हणून अनेक नागरिकांना या प्रदुषित हवेमुळे त्रास झाला आहे. (Delhi-Mumbai Air Quality Index)

Delhi-Mumbai AQI
Solar Eclipse 2022: खंडग्रास सूर्यग्रहण; जळगावात सव्वा तास दिसणार ग्रहण

जहांगिरीपुरीत AQI 770 वर

सिस्टम ऑफ एयर क्वालिटी एंड वेदर फॉरकास्टिंग ॲड रिसर्च (SAFAR) च्या माहितीनुसार दिवाळीनंतर दिल्ली आणि नोएडाच्या प्रदुषणात प्रचंड वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे दिल्लीत फटाक्यावर बंदी आहे. तरीही मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. त्यामुळे दिल्लीच्या हवेची गुणवत्ता म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) हा 323 वर म्हणजे 'अत्यंत वाईट' या श्रेणीमध्ये पोहोचला आहे. दिल्लीतील जहांगिरीपुरी येथे रात्री एअर क्वालिटी इंडेक्स 770 वर पोहोचला होता.

नवी मुंबईत AQI 300 वर

दरम्यान लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मुंबई आणि पुण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालवला आहे. मुंबईतील बीकेसी, मालाड आणि माझगावंमधील हवेचा गुणवत्ता स्तर देखील वाईट स्थितीत होता. तसेच उद्या म्हणजे बुधवारीदेखील मुंबईतील हवेची गुणवत्ता अतिशय वाईट स्थितीत राहण्याचा अंदाज आहे. संपूर्ण पावसाळ्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक स्थिती होता. मात्र, पावसाचे प्रमाण कमी होताच आणि दिवाळीतील आतिषबाजीमुळे हवेची गुणवत्ता खालवली आहे.

मुंबईतील सरासरी एक्यूआय १४५ आहे. काल, सोमवारी मुंबईती विविध भागात हवेची गुणवत्ता मोजण्यात आली. यात भांडूप ९१, कुलाबा १११, मलाड २०४, माझगाव २००, वरळी ५३, बोरिवली ९४, बीकेसी २०८, चेंबुर १५६, अंधेरी १९३, नवी मुंबई ३०० AQI अशी हवेची गुणवत्ता नोंदवण्यात आली. या वाढत्या AQI मुळे वायू प्रदूषणास संवेदनशील असणाऱ्या नागरिकांना आणि श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांना त्रास त्रास झाला आहे. एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे हवेची गुणवत्ता मोजणे होय.

Delhi-Mumbai AQI
Viral Video : मुलं खेळत असतानाच किल्ल्यात शिरला कोब्रा; घटनेचा Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

एअर क्वालिटी इंडेक्सचे प्रमाण खालीलप्रमाणे मोजले जाते.

एअर क्वालिटी इंडेक्स 0 ते 50: उत्तम हवा

एअर क्वालिटी इंडेक्स 51 ते 100: चांगली हवा

एअर क्वालिटी इंडेक्सः 101 ते 200 मध्यम हवा

एअर क्वालिटी इंडेक्स 201 ते 300 दरम्यानः खराब हवामान

एअर क्वालिटी इंडेक्स 301 ते 400 दरम्यानः हवा अत्यंत खराब

एअर क्वालिटी इंडेक्स 400 ते 500 च्या वरः मानवी आरोग्यास हानिकारक

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com