Akshay Baisane | अक्षय बैसाणे
या अशा भन्नाट टोप्या घातलेल्या मुलांचे फोटो फिलिपीन्समध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
फिलिपीन्स देशातील लेगाझ्पी शहरात कॉलेजच्या परिक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून शिक्षकांनी त्यांनी टोपी घालून यायला सांगितलं होतं.
कॉपी रोखण्यासाठी शिक्षक मेरी जो मँडेन-ऑर्टिझ (Mary Joy Mandane-Ortiz) यांनी ही शक्कल लढवली, पण पोरांनीही आपली भलतीच अक्कल लावली ज्याने त्यांची जगात चर्चा झाली.
मेरी जो मँडेन-ऑर्टिझ यांनी विद्यार्थ्यांना केवळ डोक्यात पेपरची टोपी घाला म्हणजे दुसऱ्यांकडे पाहता येणार नाही, एवढंच सांगितलं होतं.
पण या अतिहुशार विद्यार्थांनी आपली कल्पकता पणाला लावली आणि अशा भन्नाट टोप्या तयार केल्या.
या महाशयांची दुर्बिण तर कम्माल आहे, पेपरशिवाय आजूबाजूचं काहीच दिसणार नाही
भावा तू वर्गात बसलाय, बाईकवर नाही. हेल्मेट घालून आलेला हा विद्यार्थी ट्रॅफिकचे सर्व नियम पाळत असावा का?
सन्डो हो या मन्डे रोज खाओ अण्डे... अंड्यांच्या ट्रेपासून बनवलेली खास अँटी कॉपी हॅट. कदाचित यांचा अंड्यांचा व्यवसाय असावा.
लाल दुपट्टा उड़ गया रे मेरे झोंके से... या भावाची टोपी तर खरंच भन्नाट आहे.
लॉलीपॉप? ही ताई तर परिक्षा केंद्रात लॉलीपॉप विकायला आली. तुम्हाला आवडेला का?
म्याव-म्याव... ही ताई नक्कीच मांजरप्रेमी असणार.
हा भाऊ बोर्ड फाडून येणार हे नक्की. फाईलचा असा वापर कधी केलाय का? या सगळ्यांमधली कोणती टोपी तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे नक्की सांगा.
भारतातील १० सुंदर महिला राजकारणी | Top 10 Beautiful Indian Female Politicians
ही वेबस्टोरी पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर जाऊन खाली क्लिक करा.