सावधान! पुण्यात झिका व्हायरसची एण्ट्री; वारीच्या तोंडावर नागरिकांचं टेंशन वाढलं
Zika Virus SAAM TV
मुंबई/पुणे

Zika Virus in Pune : सावधान! पुण्यात झिका व्हायरसची एण्ट्री; वारीच्या तोंडावर नागरिकांचं टेंशन वाढलं

Tanmay Tillu

पुणे :

पुण्यात जीवघेण्या झिका व्हायरसनं एण्ट्री केल्यामुळे मोठं टेंशन वाढलंय. पुण्यातील कोथरूड परिसरातील डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिकाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. पुण्यात प्रथमच झिकाचे रुग्ण आढळले आहेत. कोथरूडच्या एरंडवणे भागातील एका 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या 13 वर्षीय मुलीमध्ये झिकाची लक्षणं आढळली आहेत. विशेष म्हणजे डास चावल्यामुळे या दोघांना झिकाची लागण झालीय.

देशात कोरोनाचा शिरकाव झाला तोही पुण्यातून...दुबईहून परतलेल्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर राज्यासह देशात कोरोना पसरला..त्यानंतर राज्यातील रुग्णांची काय अवस्था होती ते आपण पाहिलंचं...आता पुण्यातूनच झिकाचे रुग्ण आढळल्यानं आरोग्य प्रशासन अलर्ट झालंय. त्यात पुण्यासारख्या शहरात जिथे केवळ राज्यातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून विद्यार्थी,पर्यटक ये-जा करतात. तिथेच झिकाचे रुग्ण आढळल्यानं राज्यासाठी हा धोका ठरू शकतो.

कसा पसरतो झिका व्हायरस?

झिका हा डासांपासून पसरणारा विषाणू आहे. एडिस डास चावल्यानं झिकाचा संसर्ग होतो. हे डास केवळ रात्रीच नाही तर दिवसाही चावतात. हा विषाणू गर्भवती महिलेकडून तिच्या गर्भात जाऊ शकतो. गर्भधारणेवेळी संसर्गामुळे काही जन्मजात दोष आढळतात. झिकासाठी कोणतीही लस किंवा औषध नाही

झिका व्हायरसची लक्षणे -

- ताप

- पुरळ, रॅशेस

- डोकेदुखी

- सांधेदुखी

- लाल डोळे

- स्नायू दुखणे

झिका झाल्यास काय काळजी घ्यावी?

- आराम करा

- डिहायड्रेशन टाळा

- भरपूर पाणी प्या

- ताप आणि वेदना शमण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या

डॉक्टरांनी आरोग्यविषयक काय सल्ला दिला?

सध्या हवामानात प्रचंड बदल होतायत. पावसाला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. कधी तीव्र ऊन तर कधी मुसळधार पाऊस बरतोय. हे वातावरणात विषाणू वाढीसाठी पोषक असतं त्यामुळे झिका, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तुम्ही देखील आजारी असाल आणि ताप, सर्दी ही लक्षणं तुमच्यात असतील तर घरगुती उपचार करु नका..वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि काळजी घ्या..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Old Pension Video: कर्मचारी 10 अन् सरकार भरणार 14 टक्के! जुन्या पेन्शनला सरकारचा नवा पर्याय

T20 World Cup: टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू

Crocodile Video: चिपळुणमध्ये महाकाय मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, नागरिकांची भीतीनं गाळण

Jayant Patil: १६ महिन्यात राज्यात ३००० हून अधिक शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, विधानसभेत जयंत पाटील संतापले

VIDEO: पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट, मंत्री भुसेंना पीक विमा केंद्र चालकांचा पुळका? विरोधकांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT