kirit somaiya
kirit somaiya SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : किरीट सोमय्या यांची पीएचडी बोगस? RTIच्या माध्यमातून 'ही' माहिती आली समोर

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Maharashtra Political News : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पीएचडीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या यांची 'पीएचडी'ची डिग्री बोगस असल्याचा दावा युवासेना माजी सिनेट सदस्याने आरटीआयच्या माध्यमातून केला आहे. या प्रकरणामुळे किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सोमय्या यांच्या पीएचडी बाबत मुंबई विद्यापीठाकडे युवा सेनेच्या माध्यमातून माहिती मागविली होती. आरटीआय कार्यकर्ते किरण पाठक यांनी विद्यापीठाकडे सोमय्यांच्या पीएचडी बाबत माहिती मागवली. या संदर्भात किरीट सोमय्या यांच्या शिक्षण विषयक माहिती विभागात उपलब्ध नसल्याचे धक्कादायक उत्तर माहिती अधिकारात देण्यात आले आहे.

यामुळे युवासेनेचा किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या बोगस पीएचडी बाबतचा दावा खरा ठरत असल्याचा आरोप माजी सिनेट सदस्य प्रदीप सामंत यांनी केला आहे. यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आता युवासेनेकडून करण्यात आली आहे.

या प्रकरणावर युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सामंत म्हणाले , ' युवासेनेतर्फे आम्ही सोमय्या यांच्या पीएचडीच्या माहितीचा पाठपुरावा करत आहोत. आम्ही त्यासाठी माहितीच्या अधिकाराचा अर्ज मे महिन्यात दाखल केला होता. या प्रकरणावरून आम्ही कुलगूरू आणि कुलपतीपर्यंत पोहोचलो. कुठेही आम्हाला त्याबद्दल उत्तर देण्यात आलं नाही. आम्ही केलेलं आंदोलन पोलिसांकडून दडपण्याचा प्रयत्न केला'.

'आज, आमच्याकडे नील सोमय्या यांच्या पीएचडीबाबत महत्वाचा पुरावा सापडला आहे. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाने कुलसचिव विभागाला कळविण्यात आले होते की, सोमय्या यांच्या पीएचडीबाबत एकही पुरावा नाही. तरी देखील ही माहिती ऑगस्ट महिना आला तरी दिली नाही. अंबादास दानवे यांनी देखील विद्यापीठाकडे ही माहिती मागविली. त्यांनाही ती माहिती दिली नाही. त्यामुळे आमचा संशय खरा ठरत आहे, असा दावा प्रदीप सामंत यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली; विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

Sushma Andhare Helicopter Crash News : सुषमा अंधारेंच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा घडला?

Parenting Tips: मुलांना सुट्ट्यांमध्ये फिरायला घेऊन जाताय? त्यांना आधी शिकवा महत्वाच्या गोष्टी

Josh Baker Death: इंग्लंडच्या २० वर्षीय जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Gondia News : १५० रुपये क्विंटलने मोबदला मिळेपर्यंत भरडाई बंद ठेवण्यावर राईस मिलर्स ठाम; ५४० कोटीचे धान पडून

SCROLL FOR NEXT