Anil Deshmukh Bail: अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, सीबीआयची विनंती हायकोर्टाकडून मान्य

अनिल देशमुखांच्या जामिनाविरोधात सीबीआयने हायकोर्टात धाव घेतली होती.
Anil Deshmukh
Anil Deshmukh Saam Tv

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण त्यांचा तुरुंगातील मुक्काम आता पुन्हा एकदा वाढला आहे. त्यांच्या जामीनाला आता येत्या 27 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना तुर्तास तरी दिलासा मिळणार नाही.

Anil Deshmukh
Bharat Jodo Yatra: ...तर भारत जोडो यात्रा लगेच थांबवा; केंद्रीय मंत्र्याचं राहुल गांधींना पत्र

अनिल देशमुखांच्या जामिनाविरोधात सीबीआयने हायकोर्टात धाव घेतली होती. अनिल देशमुख यांना 12 डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सीबीआयने हायकोर्टात  (Mumbai High Court)  धाव घेतल दहा दिवसांची स्थगितीची विनंती केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. ती मुदत उद्या संपत असताना सीबीआयने पुन्हा एकदा 27 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ मिळावी अशी विनंती केली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सीबीआयची ही विनंती स्वीकारली आहे.

CBIच्या विनंती नुसार अंमलबजावणीसाठी 10 दिवस स्थगिती दिली होती. सुप्रीम कोर्टात अपील दाखल करण्यासाठी CBI नं परत वाढीव मुदत मागितली आहे. मात्र इथून पुढे कोणतीही विनंती मान्य करणार नसल्याचं देखील कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

Anil Deshmukh
Ajit Pawar : अजित पवार विधानसभेत का संतापले? नेमकं काय झालं?

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालयाने (ED) त्यांना वर्षभरापूर्वी अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली. तेव्हापासून अनिल देशमुख हे आर्थर रोड तुरूंगात होते. मध्यंतरीच्या काळात तुरूंगात त्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर देशमुख यांना उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान,मुंबई हायकोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com