Bharat Jodo Yatra: ...तर भारत जोडो यात्रा लगेच थांबवा; केंद्रीय मंत्र्याचं राहुल गांधींना पत्र

भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून केंद्र सरकार घाबरले आहे. त्यामुळेच त्यांनी हे कारण पुढे केल्याचे कॉंग्रेसने म्हणले आहे.
Bharat Jodo Yatra News Updates
Bharat Jodo Yatra News Updatessaam tv
Published On

Corona News: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने जगभरातील देशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची भारत सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळेच राहुल गांधीची भारत जोडो यात्रा थांबवण्याची सुचना केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केली आहे.(Bharat Jodo Yatra News Updates)

केंद्रिय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सर्वच राज्यांना पत्र लिहले असून त्यामध्ये कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत नियमांचे पालन होत नसेल तर ती तात्काळ थांबवावी असेही त्यांनी म्हणले आहे.

Bharat Jodo Yatra News Updates
Govinda Birthday: हिरो नंबर वन, कमाईतही नंबर वन! बॉलिवूडपासून लांब; तरीही गोविंदा आहे 'इतक्या' कोटींचा मालक

कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. विविध राज्यातील कार्यकर्ते आणि नेते या यात्रेत सहभागी होत आहेत.याच पार्श्वभूमीवर केंद्रिय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राजस्थानचे मंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहले आहे ज्यामध्ये भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर ती यात्रा तात्काळ बंद करावी असे नमुद करण्यात आले आहे.

राजस्थानमधील भाजपा खासदार पीपी. चौधरी, निहाल चंद यांनी केंद्रिय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रेमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची चिंता व्यक्त केली होती, त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी हे पत्र लिहले आहे.

"भारत जोडो यात्रेतील सदस्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत असून यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. या यात्रेतून परतल्यानंतर हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत." त्यामुळेच दक्षता बाळगण्याची सुचना या पत्रात देण्यात आली आहे.

Bharat Jodo Yatra News Updates
Dance Video : ‘भाभी तू पटोला’ गाण्यावर महिलेने केला भन्नाट डान्स; सपना चौधरीलाही टाकलं मागे!

दरम्यान, भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून केंद्र सरकार घाबरले आहे. त्यामुळेच त्यांनी हे कारण पुढे केल्याचे कॉंग्रेसने म्हणले आहे. तसेच गुजरात निवडणूकीत मोदी घरोघरी मास्क लावून फिरत होते का असाही सवाल कॉंग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com