Dombivli Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli Crime: तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, संतप्त नागरिकांनी धडा शिकवला; डोंबिवलीतील संतापजनक घटना

Dombivli Youth Assaults Traffic Police: डोंबिवलीमध्ये संतापजनक घटना घडली. एका तरुणाने वाहतूक पोलिसाला मारहाण केली. या तरुणाला स्थानिक नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला.

Priya More
  • डोंबिवलीत वाहतूक पोलिस आणि तरुणामध्ये वाद

  • तरुणाने वाहतूक पोलिसाला केली मारहाण

  • संतप्त नागरिकांनी तरुणाला पकडून दिला चोप

  • मानपाडा पोलिस व्हायरल व्हिडिओच्या आधारे तपास करत आहेत

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

डोंबिवली एका तरुणाला नागरिकाकडून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज परिसरातील ही घटना असल्याची माहिती आहे. या तरुणाचा एका पोलिस कर्मचाऱ्यासोबत वाद झाला होता. या तरुणाने वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांला मारहाण केली त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला चोप दिला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज परिसरात घडलेल्या या घटनेत एका तरुणाला काही नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. संबंधित तरुणाचा एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यासोबत वाद झाला होता. पोलिसांनी या तरुणाला गाडी बाजूला घे असे सांगितले होते. यावरून संतप्त झालेल्या तरुणाचा पोलिसांसोबत वाद झाला. या वादानंतर तरुणाने वाहतूक पोलिसाला मारहाण केली.

त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्या तरुणाला पकडून मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या घटनेमागील नेमके कारण काय? तसेच संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात येणार? याचा तपास मानपाडा पोलिस करत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी अधिकृत माहिती आणि तपासानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पावसाने पाठ फिरवली, शेतकऱ्याने उभ्या कपाशीवर फिरवला नांगर; उत्पादनाची आशा मावळली

Squats Benefits: फक्त ३० दिवस रोज स्क्वाट्स करा; वजन कमी करण्यासोबत शरीराला मिळतील 'हे' फायदे

AC Price Hike 2026 : सणासुदीत ग्राहकांच्या खिशाला कात्री! १ ऑक्टोबरपासून AC पासून TV, फ्रिजच्या किंमती वाढणार, A टू Z माहिती

Horoscope : बुध-मंगळाचा शक्तिशाली'केंद्र दृष्टी'योग! २ ऑक्टोबरपासून ४ राशींचे नशीब चमकणार, होणार अपार धनलाभ

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेला लावावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT