Actor Harassment: 'लापता लेडीज' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता सत्येंद्र सोनी सध्या एका गंभीर कारणामुळे चर्चेत आला आहे. सत्येंद्रने सोशल मीडियावर रडतानाचा एक व्हिडिओ शेअर करत एका चित्रपट दिग्दर्शकावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडिओमध्ये तो भावूक होत मानधन न देणे, मारहाण करणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप करत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सत्येंद्र सोनीने चित्रपट दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंग यांच्यावर आरोप करत सांगितले की, तो 'पेट पालकी' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. काम सुरू करण्यापूर्वी त्याला ५० हजार रुपयांची साइनिंग अमाऊंट देण्यात आली होती. उर्वरित मानधन शूटिंग पूर्ण झाल्यानंतर दिले जाईल, असे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र आठ दिवसांचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्याने उर्वरित पैशांची मागणी केली, तेव्हा परिस्थिती अचानक बदलली.
व्हिडिओमध्ये सत्येंद्र म्हणतो, "आम्ही मेहनत करून शूटिंग पूर्ण केले. मात्र पैसे मागितल्यावर आमचे सामान बाहेर फेकण्यात आले. आम्हाला हॉटेलमध्ये पुन्हा येऊ नका, असे सांगण्यात आले. एवढेच नाही तर भररस्त्यात माझ्यासोबत मारहाण करण्यात आली आणि माझा मोबाईल हिसकावून घेण्याचाही प्रयत्न झाला. आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या."
या घटनेच्या वेळी सत्येंद्रसोबत त्याचे आणखी दोन सहकारीही उपस्थित होते. तिघेही प्रचंड घाबरलेले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. काही तासांनी सत्येंद्रने आणखी एक व्हिडिओ शेअर करत आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली. मैहर पोलिसांनी वेळीच मदत केल्यामुळे आपण सुरक्षितपणे मुंबईत परतल्याचे त्याने सांगितले.
मध्य प्रदेशातील सिहोरा गावचा रहिवासी असलेला २६ वर्षीय सत्येंद्र सोनी अभिनय क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी मुंबईत आला. सुरुवातीला त्याने 'द कपिल शर्मा शो'मधून छोट्या भूमिका साकारल्या. त्यानंतर 'मिर्झापूर', 'अब तो भगवान भरोसे', 'वनवास' यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये झळकला. मात्र 'लापता लेडीज' चित्रपटातील 'छोटू' या भूमिकेमुळे त्याला खरी लोकप्रियता मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.