Salman Khan: बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता भाईजान सलमान खान लवकरच आपल्या राहत्या घराला अलविदा करणार आहे. सलमान खान बांद्रातील 'गॅलेक्सी अपार्टमेंट'मधून नव्या घरात लवकरच शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. गेल्या काही वर्षांपासून बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्या आणि २०२४ मध्ये त्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर त्याच्या सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. यामुळेच तो बांद्रातील समुद्रकिनारी उभारल्या जाणाऱ्या नव्या घरी राहायला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील चिंबई परिसरात सलमान खानच्या कुटुंबाच्या मालकीच्या भूखंडावर सहा मजली आलिशान बिल्डींग उभारली जाणार आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) ने १६ जून रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हे नवीन घर समुद्रकिनारी असून, सध्याच्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट'पासून काही अंतरावरच आहे. विशेष म्हणजे, सलमान खान १९७४ पासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहे.
२०२४ मध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर बाईकवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. तपासादरम्यान या हल्ल्याचा संबंध बिश्नोई गँगशी असल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली त्याला 'Y+' सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच, त्याच्या बाल्कनीमध्ये बुलेटप्रूफ काच बसविण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन घराचे बांधकाम सलमान खानची आई सलमा खान यांच्या मालकीच्या जमिनीवर होणार आहे. या जागेवर यापूर्वी १९५६ पूर्वी बांधलेले दोन मजली घर होते. या प्रोजेक्टमध्ये तळमजला, स्टिल्ट पार्किंग आणि त्यावर सहा मजले असतील. एकूण बांधकाम क्षेत्रफळ सुमारे १,०१४ चौरस मीटर असेल. 'सच डेव्हलपर्स'कडून या प्रकल्पाचे बांधकाम केले जाणार असून, बीएमसीने ऑक्टोबर २०२५ मध्ये प्राथमिक मंजुरी (IOD) दिली होती. मात्र, या संपूर्ण प्रकल्पाबाबत सलमान खान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.