धावती लोकल पकडताना 70 वर्षीय व्यक्तीचा तोल गेला, तितक्याच...; डोंबिवली स्टेशनवरील जीवघेणा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Dombivli cctv : धावती लोकल पकडताना 70 वर्षीय व्यक्तीचा तोल गेल्याची घटना घडली. परंतु आरपीएफने ७० वर्षीय वृद्धांचा जीव वाचवला.
kalyan news
kalyan news Saam tv
Published On

धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात ७० वर्षीय वयोवृद्धाचा जीव धोक्यात

जीआरपी पोलिसाच्या प्रसंगावधानाने वाचला जीव

थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवली स्टेशनवर जीवघेणा थरार घडल्याची घटना घडली. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात ७०वर्षीय वयोवृद्धाचा जीव धोक्यात आल्याचे पाहायला मिळालं. डोंबिवली जीआरपीच्या पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत वेळीच मदत केल्याने मोठी दुर्घटना टळली. ही संपूर्ण घटना स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ७० वर्षीय पंडित वाघ हे धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांचा तोल जाऊन ते प्लॅटफॉर्म आणि चालत्या लोकलमधील धोकादायक फटीत अडकण्याच्या स्थितीत आले. काही क्षणांसाठी त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता.

kalyan news
Vasai Shocking : फुटबॉल कोचकडून सलग ३ वर्ष अल्पवयीन मुलीवर बलात्कार; क्रीडा क्षेत्रात खळबळ

मात्र तेथे कर्तव्यावर असलेले डोंबिवली जीआरपीचे पोलीस कर्मचारी अनिल शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ धाव घेतली आणि वयोवृद्धाला सुरक्षितपणे बाहेर खेचले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला आणि पंडित वाघ यांचा जीव वाचला.

घटनेनंतर पंडित वाघ यांनी पोलीस कर्मचारी अनिल शेळके यांचे आभार मानले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिस कर्मचाऱ्याच्या धाडसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले जात आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून वारंवार जनजागृती करूनही अनेक प्रवासी धावती ट्रेन किंवा लोकल पकडण्याचा प्रयत्न करतात.

kalyan news
Kalyan : रेल्वे प्रवाशांनो सावधान! स्टेशन परिसरात फटका गँग पुन्हा सक्रिय; एकाच्या हातावर फाटका मारला अन्...

धावती लोकल पकडताना गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न न करता सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com