Mihir Shah  Saam Tv
मुंबई/पुणे

Worli Hit And Run Case: १५ मिनिटांसाठी फोन ऑन केला, अन् पोलिसांनी मिहिर शहाला बेड्या ठोकल्या; वाचा अटकेचा घटनाक्रम

Mihir Shah Arrested By Mumbai Police: मुंबईतल्या वरळीमध्ये रविवारी पहाटे भरधाव बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यांना धडक दिली होती. या अपघातामध्ये कावेरी नाखवा या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.

Priya More

मुंबईतल्या वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील (Worli Hit And Run Case) मुख्य आरोपी मिहिर शहाला (Mihir Sahh) पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. घटनेच्या तीन दिवसांनंतर मिहिरला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तीन दिवसांपासून मिहिर पोलिसांना चकवा देत होता. मिहिरच्या मित्राने १५ मिनिटांसाठी फोन ऑन केला आणि पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आले. मिहिर शहाला पोलिसांनी नेमकी कशी अटक केली हा संपूर्ण घटनाक्रम आपण जाणून घेणार आहोत...

मुंबईतल्या वरळीमध्ये रविवारी पहाटे अपघाताची ही घटना घडली होती. भरधाव बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यांना धडक दिली होती. या अपघातामध्ये कावेरी नाखवा या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. मिहिर शहा ही कार चालवत होता. त्याने महिलेला काही किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते. या घटनेनंतर मिहिरी फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके तयार केली होती. त्याचसोबत त्याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लूक आऊट सर्क्युलर देखील काढले होते.

अपघातानंतर मिहिरने त्याच्या वडिलांना फोन करून आपला फोन बंद केला होता. त्याने आपली कार वांद्रे येथे लावून पळून गेला होता. या घटनेनंतर पोलिसांनी मिहिरच्या वडीलांना ताब्यात घेतले होते. मिहिरची आई आणि बहीण देखील घर बंद करून निघून गेल्या होत्या. त्यांनी आपला मोबाईल देखील बंद केला होता. तपासादरम्यान बीएमडब्ल्यू कारच्या क्रमांकाच्या आधारे पोलिस त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत होते. पोलिसांनी मिहिरच्या मित्राचा फोन नंबरही पाळत ठेवला होता.

घटनेनंतर मिहिर शहा त्याच्या मित्रासोबत मुंबईपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या विरारला गेला होता. मंगळवारी सकाळी त्याच्या मित्राने १५ मिनिटांसाठी त्याचा फोन ऑन केला आणि मिहिरला शोधण्यात पोलिसांना यश आले. फोन ऑन होताच पोलिसांनी त्याचे लोकेशन मिळवले आणि त्यानंतर मिहिर शहाला अटक करण्यात आली. या प्रकरणी मिहिर शहाची आई आणि बहिणींसह एकूण १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिहिर शहाला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी ११ पथके तयार केली होती आणि त्यात गुन्हे शाखेचाही सहभाग होता. मिहिरविरोधात पोलिसांनी लुकआउट सर्क्युलर देखील जारी केले होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी झालेल्या अपघातानंतर मिहिरने त्याची बीएमडब्ल्यू कार वांद्रे येथील कलानगर येथे उभी केली होती. त्याने वडील राजेश शहा यांना फोनवरून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मोबाईल बंद केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Sambhajinagar Crime: विश्वास नांगरे पाटील यांच्या AI चेहऱ्याआडून मोठी फसवणूक, सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ७८ लाखांचा गंडा

Gold Rates: सोन्याला चकाकी! भावात वाढ झाली की घसरण? सोनं खरेदीपूर्वी वाचा आजचे लेटस्ट दर

LIC Scheme: LIC ची भन्नाट योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा

Car Tire Pressure: पावसाळ्यात गाडीच्या टायरचा योग्य दाब किती असावा? गाडी चालवताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT