Who Is Mihir Shah Saam Tv
मुंबई/पुणे

Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी मिहिर शाहविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी

Worli Hit And Run Case Latest Update: अपघातानंतर कारचालक मिहिर शाह फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून आता आरोपी मिहिर शहाच्या नावाने लूक आऊट सर्क्युलरही जारी करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड| मुंबई, ता. ८ जुलै २०२४

वरळीमधील हिट अँड रन प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे भरधाव बीएमडब्ल्यू कारने दांपत्याला उडवल्याची घटना घडली. या प्रकरणी आता सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून पोलिसांनी आरोपी मिहिर शहाच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी पहाटे वरळीमध्ये भरधाव बीएमडब्ल्यू कारने दांपत्याला उडवल्याची घटना घडली. त्यानंतर गाडीवरील महिलेला काही किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. या अपघातानंतर कारचालक मिहिर शाह फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून आता आरोपी मिहिर शहाच्या नावाने लूक आऊट सर्क्युलरही जारी करण्यात आले आहे.

आरोपी परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी लूकआऊट सर्क्युलर काढले असून मिहिर शहाला शोधण्यासाठी सहा पथकं स्थापन करण्यात आली आहेत. तर गुन्हे शाखा देखील या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहे.

दरम्यान, काल वरळी हिट अँड रन प्रकरणात वरळी पोलिसांनी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा आणि राजेंद्रसिंह बिडावत यांना अटक केली. राजेश शहा आरोपी मिहिर शहा यांचे वडील आहेत तर चालक राजेंद्रसिंह बिडावत अपघातावेळी गाडीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसभराच्या चौकशीनंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT