Worli Hit And Run Case: अपघातपूर्वीचे CCTV फुटेज आले समोर, कारमधून उतरताना दिसला मिहीर शहा

Worli Hit And Run Case: या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिहीर शाह चार मित्रांसह मर्सिडीज कारमधून उतरताना आणि कारमध्ये बसताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेज जुहू व्हॉईस ग्लोबल तापस बारच्या आवारातील आहे.
Worli Hit And Run Case: अपघातपूर्वीचे CCTV फुटेज आले समोर, कारमधून उतरताना दिसला मिहीर शहा
Worli Hit And Run Case CCTV footage before accident surfaced Mihir Shah was seen getting out of car bbj88 Saam Tv

पुण्याप्रमाणे मुंबईतील वरळीत हिट अँड रनची घटना घडलीय. वरळीत हिट अँड रनच्या घटनेत महिलेचा मृत्यू झालाय. एका कारने पती-पत्नीला टक्कर मारली आणि फरफटत नेलं. बीएमडब्ल्यूच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर आरोपी मिहीर शहा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेत.

या हिट अँड रन प्रकरणातील फरार मिहीर शहा शिवसेना उपनेत्याचा मुलगा आहे. आरोपी कार चालक शिंदे गटाचे पालघरमधील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा असल्याचं समोर आलंय. राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहानं याने बीएमडब्ल्यूने पती-पत्नीला उडवलं. यामध्ये महिलेचा मृत्यू झालाय. तर पती जखमी झालाय. हा अपघात घडण्यापूर्वी एका सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालाय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिहिर शाह चार मित्रांसह मर्सिडीज कारमधून उतरताना आणि कारमध्ये बसताना दिसतोय. हे सीसीटीव्ही फुटेज जुहू व्हॉईस ग्लोबल तपास बारच्या बाहेरील आवारातील आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com