Mumbai highcourt  Saam tv
मुंबई/पुणे

महिला सहकाऱ्याच्या शरीराकडे एकटक पाहणे गुन्हा आहे का? हायकोर्टाने काय निर्णय दिला?

mumbai high court News : महिला सहकाऱ्याच्या शरीराकडे एकटक पाहाणे अनैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. परंतु कायदेशीर कलमांतर्गत गुन्हा नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

Vishal Gangurde

महिला सहकाऱ्याकडे एकटक पाहण्याच्या प्रकरणावर कोर्टाचा निर्णय

महिलेने आरोपीची पोलिसांत केली होती तक्रार, त्यानंतर प्रकरण पोहोचलं कोर्टात

कोर्टाकडून आरोपीच्या विरोधातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश

गेल्या काही वर्षांत विविध क्षेत्रात आता पुरुषांच्या जोडीने महिलांचाही सहभाग वाढला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कंपनीत अंतर्गत तक्रार निवारण कमिटी देखील असते. हॉटेल इंडस्ट्री असो वा विमा कंपनी... प्रत्येक प्रकारच्या कंपनीत आता महिलांचं लक्षणीय प्रमाण पाहायला मिळते. अशाच एका विमा कंपनीतील दोन सहकाऱ्यांचा वाद थेट कोर्टापर्यंत पोहोचला. 'माझ्या शरीराकडे एकटक लावून पाहतो, असा आरोप केलेल्या महिलेचं प्रकरण थेट हायकोर्टापर्यंत पोहोचलं. त्यानंतर या प्रकरणावर हायकोर्टाने मोठा निर्णय दिला.

महिलेचा सहकाऱ्यावर गंभीर आरोप

एका नामांकित विमा कंपनीतील संपूर्ण प्रकरण आहे. महिलेने वरिष्ठ कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप केले. महिलेचा आरोप आहे की, 'सहकारी हा बैठक, सामान्य कामकाजादरम्यान छातीकडे वाईट नजरेने पाहतो. सहकाऱ्याची कृती आणि सतत अपमानजनक बोलण्यामुळे कार्यालयात काम करणे कठीण झालं आहे'.

मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एक सदस्यीय घटनापीठासमोर हे प्रकरण सादर करण्यात आलं. या प्रकरणावर निर्णय देताना न्यायमूर्तींनी सांगितलं की, 'कोणत्याही महिला कर्मचाऱ्याला एकटक लावून पाहणे नैतिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचे असून अपमानजनक आहे. परंतु व्हॉय्युरिझम (चोरून पाहणे) अंतर्गत गुन्हा मानला जाऊ शकत नाही. कोर्टाने स्पष्ट केलं आहे की, ऑफिसच्या बैठकीत पुरुषाने डोळ्याने महिलेकडे एकटक पाहणे व्हॉय्युरिझमच्या कायद्यात तांत्रिकदृष्ट्या बसत नाही'.

हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे की, 'आरोपीचा व्यवहार हा ऑफिसच्या शिष्टाचारानुसार स्वीकारण्यासारखा नाही. परंतु नैतिकता आणि कायद्यात एक अंतर असते' हायकोर्टात येण्यापूर्वी सदर प्रकरणचा तपास विमा कंपनीच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीने (ICC) केला होता. त्यांनी आरोपीला क्लीन चिट दिली होती. पुढे महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 354C (व्हॉय्युरिझम) अंतर्गत एफआयआर नोंदवला होता. यामुळे आरोपीने एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टाचे दरवाजा ठोठावला होता. या प्रकरणात कोर्टाने एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, पुण्यातून मुख्याध्यापिकेला अटक

एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; युवा नेत्याचं नगरसेवक पद रद्द, कारण आलं समोर

Snake Bite First Aid: साप चावल्यानंतर कापड बांधणे योग्य की अयोग्य? डॉक्टरांचा हा सल्ला एखाद्याचा जीव वाचवू शकतो

Weight Gain: वजन झटपट वाढतंय, पोटही सुटतंय; जाणून घ्या चुकून लागलेल्या ५ चुकीच्या सवयी

Saturn Transit 2026: जुलै महिन्यात ३ राशींवर बरसणार शनी देवाची कृपा; बुधाच्या नक्षत्रात प्रवेश करणार शनी

SCROLL FOR NEXT