Mumbai Coastal Road: कोस्टल रोडच्या दुसऱ्या समांतर बोगद्याच्या कामाला आजपासून होणार सुरुवात सुमित सावंत
मुंबई/पुणे

Mumbai Coastal Road: कोस्टल रोडच्या दुसऱ्या समांतर बोगद्याच्या कामाला आजपासून होणार सुरुवात

Mumbai Coastal Road Latest News: या मार्गामध्ये प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.७ किमी अंतराचे दोन बोगदे दोन्ही बाजूने बांधण्यात येणार आहेत.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal Road) प्रियदर्शनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.७० किमी अंतराच्या एका बोगद्याचे (Tunnel) खणन काम (Mining Work) पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या समांतर बोगद्याच्या खोदकामाला आजपासून सुरुवात होणार आहे. मरिन ड्राईव्हकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरात येणाऱ्या पहिल्या बोगद्याचे खणन जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पूर्ण झाले होते, आता वरळी बांद्राकडे जाणाऱ्या बोगद्याच्या खोदकामाला आजपासून (१४ फेब्रुवारी) सुरवात होणार आहे. (Work on the second parallel tunnel on Coastal Road will begin today)

हे देखील पहा -

दोन्ही बोगद्यांचा व्यास हा प्रत्येकी १२.१९ मीटर आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्येकी ११ मीटर इतका असणार आहे. या खोदकामासाठी टीबीएम मशीनचा (TBM Machine) तब्बल १९०० मेट्रीक टन वजनाचा भाग १८० अंशात वळवण्यात आलाय. कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी वांद्रे सागरी सेतू (Bandra-Worli Sea Link) पर्यंत बांधण्यात येतोय. या मार्गामध्ये प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.७ किमी अंतराचे दोन बोगदे दोन्ही बाजूने बांधण्यात येणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT