ठरलं! १७ फेब्रुवारीला वॉटर टॅक्सीचं उद्‌घाटन

१७ फेब्रुवारीला केंद्रीय बंदर आणि जलवाहतूकमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते वॉटर टॅक्सीचे उद्घाटन केले जाणार, त्यानंतर ही सेवा नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे.
Water Taxi
Water TaxiSaam Tv
Published On

मुंबई - मुंबई ते नवी मुंबई जल प्रवासासाठी वॉटर टॅक्सीचा पर्याय मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. १७ फेब्रुवारीला केंद्रीय बंदर आणि जलवाहतूकमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते वॉटर टॅक्सीचे (Water Taxi) उद्घाटन केले जाणार, त्यानंतर ही सेवा नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे. ही सेवा चालविण्याची जबाबदारी इन्फिनिटी हार्बर सर्विस आणि वेस्ट कोस्ट मरिन या दोन खासगी कंपन्यांवर असेल.

हे देखील पहा -

पहिल्या टप्प्यात 32 आसनी, 40 आसनी आणि 50 आसनी अशा तीन वॉटर टॅक्सी मुंबई-नवी मुंबई- एलिफंटा या मार्गावर चालवण्यात येणार आहे. डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते बेलापूरमार्गे पुढे माझगाव येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल आणि एलिफंटापर्यंत जाण्यासाठी एका प्रवाशाला 290 रुपये आकारण्यात येतील. तर महिन्याच्या पासासाठी 12 हजार रुपये आकारण्यात येणार आहेत.

Water Taxi
Assembly Elections: तीन राज्यांतील 165 जागांसाठी आज मतदान, 1519 उमेदवारांचे भवितव्य ठरणार

मुंबईच्या नजीकच्या शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी या जलमार्ग वाहतुकीची सुरूवात करण्याची घोषणा गेल्या वर्षी सरकारने केली होती . त्यानुसार महाराष्ट्र पोर्ट ट्रस्ट आणि सागरी महामंडळ युद्धपातळीवर कामाला लागले होते. परंतु कोरोनामुळे जेट्टी उभारण्याचा कामात अडथळा निर्माण झालेला होता. पण आता सगळी तयारी पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com