Assembly Elections: तीन राज्यांतील 165 जागांसाठी आज मतदान, 1519 उमेदवारांचे भवितव्य ठरणार

गोव्यात 40 जागांसाठी मतदान तर उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी मतदान होणार आहेत.
Voting
VotingSaam Tv
Published On

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक एकूण 7 टप्प्यात होणार आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. उत्तर प्रदेशामधील 9 जिल्ह्यातील 55 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 586 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप (BJP) विरुद्ध समाजवादी पार्टीची असणार आहे. तर दुसरीकडे गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गोव्यात (Goa) 40 जागांसाठी मतदान तर उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी मतदान होणार आहेत.

पश्चिम उत्तर प्रदेशातील बिजनौर, सहारनपूर, अमरोहा, संभल, मुरादाबाद, रामपूर, बरेली, बदाऊन आणि शाहजहानपूर या नऊ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. या सर्व जिल्ह्यांतील 55 जागांपैकी 25 हून अधिक जागांवर मुस्लिम मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. त्याचवेळी 20 जागांवर दलित मतदारांचा प्रभाव 20 टक्क्यांहून अधिक आहे. शेतकरी आंदोलनामुळे या जागांवर भाजपला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते.

हे देखील पहा -

यूपीमध्ये 12,544 मतदान केंद्रांवर मतदान

मतदानाची पक्रिया 12544 मतदान केंद्रावर पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी 51 निरीक्षक , पोलिसांचे 9 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय मतदान केंद्रांचं निरीक्षण करण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात ज्या जिल्ह्यात मतदान केंद्र आहेत त्या जिल्ह्यांच्या प्रवेशाच्या ठिकाणी केंद्रीय पोलीस दल, राज्याचं पोलीस दैल, होमगार्ड, निमलष्करी दल दखल तैनात करण्यात आली आहेत. संवेदनशील मतदान केंद्रावर ड्रोनची नजर असणार आहे.

Voting
नाशिक हादरलं! वडिलांसोबत फिरायला गेलेल्या दहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

यावेळी उत्तराखंडची निवडणूक रंजक आहे

गेल्या वेळी उत्तराखंडमधील 70 जागांपैकी 57 जागा भाजपकडे आणि 11 जागा काँग्रेसकडे होत्या. तर दोन जागा अपक्षांनी काबीज केल्या. यावेळी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये असल्याचे मानले जात आहे. मात्र अनेक जागांवर आम आदमी पार्टी, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि उत्तराखंड क्रांती दलासह अपक्ष उमेदवारांची उपस्थिती निवडणूक रंजक बनवू शकते. तरुण नेतृत्व विरुद्ध अनुभवी वयोवृद्ध नेतृत्व अशी निवडणूक लढत म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. ज्या अंतर्गत या निवडणुकीत भाजपचे युवा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे.

Voting
BMC : कांदिवलीतील मनपा रुग्णालयात फुप्फुस पुनर्वसन केंद्र कार्यान्वित

गोव्यात कडवी स्पर्धा

गेल्या वेळी गोव्यातील 40 जागांपैकी 17 जागा काँग्रेसने, तर 13 जागा भाजपने जिंकल्या होत्या. असे असतानाही भाजपने सरकार स्थापन केले. भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष आणि तीन अपक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केली. मात्र यावेळी विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत होऊ शकते. सत्ताधारी पक्ष भाजपला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांचे कडवे आव्हान आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे देखील त्यांच्या वडिलांच्या पारंपरिक पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com