Water park accident saam tv
मुंबई/पुणे

Water park accident: वॉटर पार्कमध्ये जात असाल तर ही बातमी वाचाच! स्लाईडवरून घसरून महिलेचे तुटले ४ मणके

Water slide accident: शिरूरमधील वॉटरपार्कमध्ये स्लाइड अपघातात महिला गंभीर जखमी होऊन कायमची अपंग झाली. पाण्याची पातळी कमी आणि वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे प्रश्न निर्माण झाले. पोलिसांनी प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एप्रिल महिना सुरू झालाय आणि संपूर्ण राज्यभरात उकाडा जाणवू लागला आहे. या गरमीपासून थोड्या थंड वातावरणात जाण्याचा तुम्हीही प्लान करत असाल. अशावेळी आपण जवळच्या एखाद्या रिसॉर्टमध्ये जाण्याचा प्लान करत असतो. जर तुम्हीही रिसॉर्टचा प्लान करत असाल तर थांबा आणि ही बातमी पहिल्यांदा वाचा.

शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोलीच्या वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पिकनीकसाठी आलेल्या एका महिलेचा वॉटर स्लाइडवर अपघात होऊन तिचं अर्धे शरीर कायमचं निकामी झाल्याची घटना समोर आलीये. यावेळी त्यांचे ४ मणके तुटल्याचंही समोर आलंय. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी वॉटरपार्क प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

करंदीमधील ३७ वर्षांच्या अश्विनी संदीप नप्ते या आपल्या कुटुंबासह मोराची चिंचोली इथल्या जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटरपार्कमध्ये पिकनीकसाठी गेल्या होत्या. त्या वॉटर स्लाईडचा आनंद घेण्याचा विचार करत होत्या मात्र हा आनंद काही क्षणांतच भीषण अपघातात बदलला.

पाण्याची पातळी कमी असल्याने दुखापत

अश्विनी नप्ते या वॉटर स्लाइडवरून घसरत खाली येत असताना स्लाइडमध्ये पाण्याची पातळी अत्यंत कमी होती. त्यामुळे त्या जोरात खाली आपटल्या. या धक्क्यामुळे त्या जागीच बेशुद्ध पडल्या होत्या. या घटनेनंतर वॉटरपार्कमध्ये तातडीची वैद्यकीय मदत किंवा अॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती आणि हीच बाब अधिकच गंभीर मानली जात आहे.

कुटुंबियांनी केली अॅम्ब्युलन्स सुविधा

अपघातानंतर नातेवाईकांनी वेळ न घालवता खाजगी अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या पाठीचे चार मणके तुटल्याचं समोर आलं आहे. या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या शरीराचा खालचा भाग कायमचा निकामी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

या प्रकारामुळे वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं जातं का याबाबत शंका निर्माण झालीये. विशेषतः वॉटर स्लाइडसारख्या धोकादायक खेळांमध्ये पाण्याची योग्य पातळी राखणं, प्रशिक्षित कर्मचारी ठेवणं आणि तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणं अत्यंत आवश्यक असते. मात्र, या ठिकाणी या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 72 कोटींचा पूल वाहतुकीविना पडून, तांत्रिक अडचणी मूळे वाहतूकिसाठी पूल सुरू होण्यास विलंब

Wakad Tourism: वाकडपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत ही थंड हवेची ठिकाणं; या विकेंडला करा प्लान

Belly Fat Loss Drink: पोटाचा वाढलेला घेर कमी करायचा आहे? मग रोज सकाळी प्या हे स्पेशल ड्रिंक

Thane Tourism : मुंबईच्या गर्दीतून घ्या ब्रेक, वीकेंडला फिरा ठाण्यातील 'हे' ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

Thursday Horoscope : करिअरमध्ये नव्या संधी मिळतील, ५ राशींचा आनंदात जाणार दिवस; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT