Surabhi Jayashree Jagdish
जर तुम्हाला पोटावरची चरबी कमी करायची असेल तर सकाळी कोमट पाण्यात एक पदार्थ टाकावा लागतो. हे पेय शरीराचा मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतो आणि चरबी जळण्याची प्रक्रिया जलद करतो.
पाण्यात तुम्ही मेथीचे दाणे टाकलेत तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. मेथीसोबत जिरं आणि लिंबू यामध्ये शरीरातील मेटाबॉलिझम वाढवण्याची क्षमता असते. सकाळी रिकाम्या पोटी हे पेय घेतल्याने शरीर अधिक कॅलरी बर्न करू लागते.
जिरं आणि मेथी हे पचनासाठी खूप फायदेशीर घटक मानले जातात. हे पचनसंस्थेला एक्टिव्ह ठेवतात आणि अन्न योग्य प्रकारे पचवण्यास मदत करतात. चांगलं पचन झाल्यास शरीरात चरबी साठण्याचं प्रमाण कमी होतं.
लिंबामध्ये व्हिटॅमिन C असतं जे फॅट बर्निंगसाठी मदत करतं. हे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास सहाय्य करतं. त्यामुळे वजन कमी होण्यास गती मिळते.
मेथीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे पोट भरल्यासारखं वाटू लागतं. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि ओव्हरईटिंग टाळता येतं. परिणामी कॅलरी इनटेक कमी होतो.
हे पेय शरीरातील टॉक्सिन घटक बाहेर काढण्यास मदत करतं. लिंबू आणि जिरं यामुळे लिव्हरचं कार्य सुधारतं. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
जिरं शरीरातील सूज आणि वॉटर रिटेन्शन कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे शरीर हलकं वाटू लागतं. यामुळे वजन कमी झाल्याचा अनुभव मिळतो.