Mumbai Crime News AI Photo
मुंबई/पुणे

Mumbai Crime : रिसॉर्टवर नेलं, शारीरिक संबंध ठेवले; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुणीवर गुन्हा

South Mumbai Crime News : एका १७ वर्षीय मुलीचं अपहरण आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली २४ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर दक्षिण मुंबई हादरली आहे.

Bhagyashree Kamble

Mumbai Crime News : एका १७ वर्षीय मुलीचं अपहरण आणि लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली २४ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना दक्षिण मुंबईत घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तपासात हे प्रकरण उघडकीस आलं. या घटनेनंतर २४ वर्षीय महिलेला अटक तर, अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत राहत आहे. तिचे पालक मुंबईच्या उपनगरात राहतात. ७ जानेवारीला तिने कॉलेजला जाते म्हणून घर सोडलं. नंतर आईला कॉलेज जात आहे, काळजी करू नकाेस, असा मेसेज केला. मात्र, काही तासानंतर तिचा फोन बंद लागला. यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली.

पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मुलीचा शोध सुरू केला. मुलीसोबत असलेल्या संशयित महिलेचे कॉल डिटेल्स मिळवले. त्या महिलेने काही दिवसांपूर्वी विरार येथील हॉटेलमध्ये फोन केला होता. त्यानंतर पोलिसांनी विरार येथील हॉटेलमध्ये धाव घेतली. हॉटेल कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, एक अल्पवयीन आणि एक महिला आली असल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्यांना रूम देण्यात आली नाही, असंही हॉटेल कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

नंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. परिसरातील सिम कार्ड विक्रेत्याची चौकशी केली आणि महिलेचा नंबर मिळवला. नंबरचं लोकेशन ट्रेस करत पोलीस विरारमधील एका रिसॉर्टमध्ये पोहोचले. तिथे पोलिसांना आरोपी तरूणी आणि अल्पवयीन मुलगी आढळून आली. दोघींनी बहिणी असल्याचं सांगितलं. तसेच एक परिक्षेसाठी विरारला आल्याचं त्यांनी सांगितलं.

पोलिसांनी तरूणी आणि मुलीची चौकशी केली असता, दोघींनी एकमेकांवर प्रेम असल्याचं कबूल केलं. पण मुलगी अल्पवयीन असल्याकारणाने तरूणीविरोधात पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. तसेच अल्पवयीन पीडित मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. आरोपी तरूणीच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

SCROLL FOR NEXT