Vaibhav Naik: वैभव नाईकांच्या अडचणीत वाढ, पत्नीला एसीबीची नोटीस

Shiv Sena Leader Vaibhav Naik: शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वैभव नाईक यांच्या पत्नीला लाच लुचपत प्रतिबंध विभागाने चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे.
ACB Notice
ACB NoticeSaam Tv News
Published On

कोकणात शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत विभागाने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. नाईकांसह त्यांच्या पत्नीला म्हणजेच स्नेहा वैभव नाईक यांनाही रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावली आहे. ११ फेब्रुवारीला कागदपत्रांसह स्नेहा नाईक यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीसीमध्ये वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांना चौकशीसाठी ११ फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या आधी देखील वैभव नाईक यांच्या मालमत्ता प्रकरणी चौकशी झाली होती. मात्र, आता वैभव नाईक यांच्या पत्नीची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ACB Notice
Crime News: सावत्र आईचं भयानक कृत्य! ८ वर्षीय मुलीची केली निर्घृण हत्या; 'अशी' सापडली पोलिसांच्या जाळ्यात

वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांचे एचयुएफ व नाईक स्टोन इंडस्ट्रीजचे १ जानेवारी २००२ ते २९ जानेवारी २०२२ या कालावधीतील उत्पन्न, मालमत्ता, खर्च याबाबातची माहिती देण्यास सांगितले आहे. नोटीसीमध्ये चौकशीसाठी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याते आदेश देण्यात आले आहे.

ACB Notice
Arvind Kejriwal: राज्यपाल की राष्ट्रपती? कोणती ऑफर मिळाली? ऐन निवडणुकीत केजरीवालांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर नेम

तसेच या कालावधीत आयकर विवरणपत्रे, ऑडीट रिपोर्ट, कॉम्प्युटेशन ऑफ इनकम, शेड्युल बॅलन्सशीट, प्रॉफिट अॅन्ड लॉल अकाऊंट डिटेल्स व त्यासंबंधीत कागदपत्रांसह ११ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आदेश रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक यांनी नोटीसीद्वारे दिले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस जारी केल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'या पूर्वीही आम्ही सहकार्य केलं होतं. यापुढे देखील करू. दबाव टाकला तरी दबणार नाही. पक्षात येण्यासाठी कोणाकडून ऑफर नाही मात्र जरी आल्या तरी स्वीकारणार नाही. मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि निष्ठावंत म्हणून राहीन', असं वैभव नाईक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com