Navi Mumbai Saam Tv News
मुंबई/पुणे

Crime News: नवरा सतत मारायचा, बायकोची सटकली, आधी कारल्याच्या ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या घातल्या..नंतर

Navi Mumbai Wife Kills Husband Crime News: मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पत्नीनं पतीची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना नवी मुंबईच्या उलवेमध्ये घडली आहे.

Bhagyashree Kamble

मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पत्नीनं पतीची हत्या केली आहे. आधी कारल्याच्या ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या घातल्या. नंतर नाक आणि तोंड दाबून पतीची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना नवी मुंबईच्या उलवेमध्ये घडली आहे.

पतीची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह उलवे येथील खाडी पुलावर टाकण्यात आला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपास केला असता, पत्नीनं हत्या केली असल्याचं समोर आलं. या प्रकरणी तिघांना पोलिसांना अटक केली आहे.

उलवे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जाचाला कंटाळून पत्नीनं पतीची निर्घृण हत्या केली आहे. साथीदार आणि मुलाच्या मदतीनं पत्नीनं पतीचा काटा काढला आहे. सचिन मोरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, आरोपी पत्नीचं नाव रेश्मा मोरे असे आहे. मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पत्नी पतीकडे घटस्फोटाची मागणी केली.

मात्र, पती घटस्फोट द्यायला तयार नव्हता. पण छळ हा सुरूच होता. याच त्रासाला कंटाळून पत्नीनं पतीचा काटा काढण्याचं ठरवलं. पत्नीच्या मित्रानं नशेच्या गोळ्या दिल्या. पत्नीनं कारल्याच्या ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या घालून पतीला दिले. नंतर पतीला रिक्षामध्ये नेत पत्नीनं नाक आणि तोंड दाबून पतीची हत्या केली.

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह उलवे येथील खाडी पुलावर टाकण्यात आला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू झाला. तपासादरम्यान रेश्मावर संशय आल्यानं तिचा मोबाईल आणि सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपासादरम्यान, घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी उलवे पोलिसांनी आरोपी रेश्मा मोरे सह तिचा मित्र प्रथमेश म्हात्रे आणि रोहित टेमकर या तिघांना अटक केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अकोला स्थानिक स्वराज निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालं चिन्ह

अहंकारी रावणाची लंका खाक झाली, अहंकाराच्या लंकेवरुन शिंदे-फडणवीस भिडले

1280 रुपयांत सरकारी नोकरी? सरकारने नोकरीसाठी वेबसाईट बनवली?

Commonwealth Games: २० वर्षांनंतर भारताकडे कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद; 'या' शहरात होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

SCROLL FOR NEXT